संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र. 
मराठवाडा

नापास शिक्षकांच्या पोटावर कारवाईची छडी?

महेश गायकवाड

जालना - मुले परीक्षेत नापास झाली की शिक्षक हातावर छडी देतात असे म्हटले जाते. पण शिक्षकच नापास होत असतील तर त्यांच्या हातावर नाही, पण पोटावरच छडी बसण्याची शक्‍यता आहे.  

शासनाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या अनुदानीत, विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.   दरम्‍यान,  रविवारी (ता. 19)  अनेक शिक्षक टीईटी परीक्षा देणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निश्‍चित केली आहे. त्यानुसार खासगी शिक्षण संस्थेत वर्ष 2013 नंतर नियुक्त डीएड, बीएड शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात आली. ऑगस्ट 2018 मध्ये शासनाने परिपत्रक काढून मार्च 2019 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची शेवटीच संधी दिली होती. मात्र, त्यानंतरही अनेक शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण प्रमाणपत्रे सादर केलेली नाही. त्यामुळे आता या शिक्षकांची थेट सेवा समाप्ती करण्याचे आदेश प्राप्त झाले. जिल्ह्यातील अशा शिक्षकांचा माहिती संबंधित शिक्षण संस्थेकडून मागविण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी दिली आहे. जानेवारीअखेर ही माहिती प्राप्त होणार आहे. 

कारवाईबाबत प्रश्‍नचिन्ह 

दरम्यान, खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले; परंतु टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची संख्या चाळीसच्या आसपास असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या शिक्षण संस्थेत कार्यवाहीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT