Artificial scarcity of seed-fertilizers sakal
मराठवाडा

Jalna : बियाणे-खतांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई; अतुल सावे

पालकमंत्री अतुल सावे : खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत विविध सूचना

सकाळ वृत्तसेवा

जालना : खरीप हंगामात खते-बियाणांची कृत्रीम टंचाई करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहे.

कृषी विभागाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात खरीप हंगामात बी-बियाणे व खतासह कृषी निविष्ठांची मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरत असताना त्यांची उगवण क्षमता तपासूनच त्या बियाणांची लागवड करावी. जिल्हा प्रशासनाने बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध द्यावे.

जिल्ह्यातील पीक कर्जाची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करावी. जे बँक अधिकारी पीक कर्ज वाटपाच्या हयगय करतील त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली करा. या खरीप हंगामापासून केवळ एका रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीकविमा काढता येणार आहे. दुकानदारांनी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना बंधने घालू नयेत, तसेच शेतकऱ्यांची तक्रार येताच कृषी विभागाने तत्काळ दखल घेत कारवाई करावी.

जिल्ह्यात बेमोसमी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठवा. कृषीपंपाची पाच हजार २६९ प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरी सहा लाख १९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येणार आहे.

कृषी निविष्ठा गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानाला अनुकूल शेतकरी होण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पोकरा योजनेतून सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात उत्पादन क्षमता वाढीसाठी नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. मागील रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बऱ्याचअंशी अधिक उत्पादन क्षमता गाठली आहे, असे प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी.आर. कापसे यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT