Latur District Collector, Coronavirus  
मराठवाडा

आदेशाचे उल्लंघन करून गर्दी जमविल्यास कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

लातूर : कोरोनाबाधित रूग्णांच्या सहवासात आलेल्या जिल्ह्यातील संशयित तेरा रूग्णांपैकी अकरा व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन व्यक्तींतही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. या व्यक्ती आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आहेत. कोरोनाची भीती न बाळगता काळजी घेण्याची गरज आहे. विषाणूला क्षुल्लकही समजून चालणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण कायद्यासह आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार गर्दीचे कार्यक्रम घेण्यास बंदी असून या आदेशाचे उल्लंघन करून गर्दी जमवणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता.१६) पत्रकार परिषदेत दिला.


दरम्यान औसा येथे ता.२३ व ता.२४ मार्च रोजी होणारा मुस्लिम समाजाचा इज्तेमा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. रूग्णालये व औषधी दुकाने वगळून गर्दी होणारी शाळा व महाविद्यालयांसह सर्व ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात मॉल्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांसह अभ्यासिकांचाही समावेश आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात संसर्ग वाढल्यास विलगीकरणाच्या सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. यात चाकूरच्या सीमा सुरक्षा बलाकडे दहा विलगीकरणाची तसेच दोनशे खाटांची सुविधा तयार ठेवण्यात आली आहे. घरी सोडण्यात आलेल्या संशयितांवर पोलिस बीट अंमलदार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व आशा कार्यकर्तींकडून निगराणी ठेवण्यात येत आहे. सुटी देण्यात आल्यामुळे लोकांनी बाहेर फिरायला न जाता घरीच थांबावे. जिल्ह्यात बहुतांश नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी नसल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. यामुळे विषाणूला क्षुल्लक न समजता वैयक्तिक स्वच्छतेची पुरेशी काळजी घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. विनाकारण गर्दी करून नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत माले आदी उपस्थित होते.


तापाच्या रूग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी
कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या कमी झालेली नाही. महाविद्यालयात कोरोनासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वतंत्र प्रवेश असलेला कक्षही स्थापन करून खाटाची संख्या वाढवण्यात येत आहे. सुविधांसाठी जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्याकडून तत्पर साहाय्य मिळत आहेत. या स्थितीत तापाचा आजार असलेल्या रूग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याचा विचार असून त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ.ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT