Amit Deshmukh sakal
मराठवाडा

Amit Deshmukh : अमित देशमुख, आता राज्यव्यापी व्हा! ; काँग्रेस नेत्यांचा सल्ला,विलासरावांच्या पुतळ्याचे अनावरण

अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहत आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहत आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे लातूर सोडून तुम्ही महाराष्ट्रभर फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, असा सल्ला आणि ग्वाही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे युवा नेते, आमदार अमित देशमुख यांना दिली.

निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्मृती सोहळा, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण, ‘विलास भवन’ या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेज पाटील, विश्वजित कदम, उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘भविष्यकाळ तुमचा आहे. देश व राज्य कठीण स्थितीतून जात आहे. अशा वेळी तरुणांची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पुढे आले पाहिजे. आम्ही ज्येष्ठ तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहोत,’’ असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.

रितेश देशमुख गहिवरले

अभिनेते रितेश देशमुख यांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘पप्पांना जाऊन बारा वर्षे झाली. त्यांची उणीव सतत जाणवत आहे’, असे म्हणताच त्यांना गहिवरून आले. या वेळी सभागृह स्तब्ध झाले होते. आमदार अमित देशमुख यांनी उठून रितेश यांच्या पाठीवर हात ठेवत धीर दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Assembly chaos: पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा! भाजप अन् टीएमसी आमदार भिडले

Nagpur: नागपूर होणार आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र; नागपूरला तिसऱ्या रिंगरोडची जोड, दोन्ही प्रकल्पांवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

Nashik Ganesh Visarjan : वेळेत विसर्जन! नाशिक पोलीस आयुक्तांचा गणेश मंडळांना '२० मिनिटांचा' अल्टिमेटम

Latest Marathi News Updates : महागाईला उतारा – स्वस्त कांदा-टोमॅटो थेट व्हॅनमधून !

Vena River: हिंगण्यात वेणा नदीत बुडालेल्या ऑटोचालकाचा शोध सुरू; शुभम पिल्लेवार हयात नाही

SCROLL FOR NEXT