मराठवाडा

न्यायाधीशास धमकावणाऱ्या वकिलाला तुरुंगाची हवा 

सुषेन जाधव

औरंगाबाद : आरोपीला शिक्षा सुनावू नये यासाठी एका वकिलाने थेट न्यायाधीशांनाच धमकाविले. प्रकरणी 67 वर्षांच्या रामचंद्र कागणे या वकिलाला एका आठवड्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमुर्ती विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिले आहेत. दंड न भरल्यास कागणे यास आणखी दोन दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे. 

न्यायालय प्रशासनात हस्तक्षेप करणे गंभीर असून असे वकिलाद्वारे कृत्य सहन केले जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने सुनावत फौजदारी स्वरूपाच्या न्यायालयीन बेअदबीबद्दल (कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट) कागणेला दोषी ठरविले. हा निकाल लागताच न्यायालयात हजर असलेल्या व जामिनावर असलेल्या कागणेना लागलीच ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. तब्बल 12 वर्षांनी ही शिक्षा झाली आहे. 

काय होते प्रकरण?
परभणीचे तत्कालीन हंगामी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक गोविंदराव बिलोलीकर यांनी 7 ऑक्‍टोबर 2005 रोजी कागणे यांच्या अशिलास बलात्काराबद्दल दोषी ठरविले होते. शिक्षेसंदर्भात आरोपीचे म्हणणे ते ऐकून घेत असताना कागणे यांनी अचानक आरडा-ओरडा करत न्यायासनाकडे धावत गेले व स्टेनोची शॉटॅहॅंडची वही हिसकावून घेऊन भिरकावलेली वही ती पब्लिक प्रॉसिक्‍युटरच्या डोक्‍यावर आदळली. न्यायालयातीच्या शिपायाने ती वही उचलून स्टेनोला दिली. पण कागणे यांनी पून्हा हिसकावून घेत वही भिरकावून दिली. 

न्यायालय निकाल कसे देते तेच पाहतो !!! 
वही भिरकावल्यानंतर न्यायालय निकाल कसे देते तेच पाहतो. न्यायालयाची दादागिरी चालू देणार नाही. "इडियट मॅजिस्ट्रेट', असे रागाने ओरडत त्याने न्यायाधीश बिलोलीकर यांना धमकावले होते. ऍड. कागणे हे गंगाखेड तालुक्‍यातील कागणेवाडीचे रहिवासी असून गेली 30 वर्षे परभणी जिल्हा सत्र न्यायालयात वकिली करत होते. याचिकेत बाजू महेंद्र नेरलीकर यांनी शासनाची बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT