covid 19 covid 19
मराठवाडा

कोरोनानंतर आता डेंग्यू व चिकन गुणिया सदृश आजाराची साथ सुरु !

रुग्णाच्या परिवारातील आणि गावातील नागरिकांची आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या वतीने तापाची तपासणी करण्यात येत आहे

अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेनंतर आणि आता तिसऱ्या लाटेची चर्चा असतानाच गेल्या महिनाभरात शहरासह ग्रामीण भागात साथीचे आजार वाढताहेत. तालुक्यात डेंग्यू व चिकन गुणिया सदृश 69 रुग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासनाकडून गावपातळीवर विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून रुग्ण व रुग्णाचा संपर्कातील नागरिकांची रक्तचाचणी करण्यात येत आहेत.

तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात डेंग्यू व चिकन गुणिया सदृश्य साथ आजाराचे 38 रुग्ण आढळून आले असून यामुळे आरोग्य प्रशासनाची धावपळ सुरू झाली. शहरात 11 तर ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळुन आले होते. यामध्ये सर्वाधिक येळी येथे नऊ, गुंजोटी तीन, एकोंडी, दाळींब, नारंगवाडी, कदेर येथे प्रत्येकी दोन तर कडदोरा, तुरोरी, तुगाव, सुपतगाव, कोळसुर (गुंजोटी), नाईचाकूर, बलसुर येथे प्रत्येकी एक रुग्ण डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आले आहेत. या गावात आबेट औषधांची फवारणी करण्यात आली असून संबंधित गावात प्रत्येक घरात पाणीसाठ्याची कीटक शास्त्रीय सर्व्हेक्षण करून पाण्यात डासांच्या अळ्या आहेत का ? याचा शोध घेऊन त्याचे निर्मूलन करण्यात येत आहे.

रुग्णाच्या परिवारातील आणि गावातील नागरिकांची आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या वतीने तापाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच कोरडा दिवस पाळणे, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजना राबवून गावात साफसफाई, औषध फवारणी करण्यात येत असून बाधित गावातील रक्त नमुने घेण्यात येत आहेत. दरम्यान तालुक्यात आतापर्यंत 69 जणांचे रक्त नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी सोलापूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आहे. त्यापैकी 39 नमुन्यांचा अहवाल आला असून त्यामध्ये दोन चिकन गुणिया व चार जणांस डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून 33 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 30 रक्त नमुन्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

"डेंग्यू हा संसर्ग आजार एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामुळे होतो. घर व परिसरात स्वच्छता राखणे, नाली सफाई, घरातील पाण्याची टाकीची कोरड्या ठेवणे आदी स्वरूपाची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व ग्रामपंचायतींना गावात धुर फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ताप येणे, अशक्तपणा व चिडचिड वाढणे आदी प्राथमिक लक्षणे जाणवल्यास जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
- डॉ. प्रताप शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

Alibag Beach Tar Balls : पर्यटकांच्या आवडत्या अलिबाग बीचवर डांबराचे थर; तेलगळती की जहाजांचा कचरा? 'टार बॉल्स'मुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील पळशी शिवारात शेततळ्यात पडून सहा वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

"२७ कोटींचा दबाव नाही, तर..." रिषभ पंतच्या खराब फॉर्मवर कोच जस्टीन लँगर यांचं मोठं विधान; म्हणाले कॅप्टन केल अन्..

Kolhapur Cafe Illegal Raid : ‘कॅफे’त वाढदिवसाचा नावाखाली नाजूक विषयांना पाठबळ; कोल्हापुरात कॅफेत चटई, उशी, सोफासेट पाहून पोलिसही अचंबीत

SCROLL FOR NEXT