हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी उघडीप दिलेल्या पावसाचे सोमवारी (ता.३०) पूर्वा नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन झाले आहे. 
मराठवाडा

हिंगोलीत पावसाचे आगमन, दुपारनंतर सूर्यदर्शन

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपूर्वी उघडीप दिलेल्या पावसाचे सोमवारी (ता.३०) पूर्वा नक्षत्राच्या मुहूर्तावर आगमन झाले आहे. सकाळपासून दुपारपर्यंत पावसाची रिमझिम सुरू असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी दीड वाजता पाऊस थांबल्यावर सुर्यदर्शन झाले. मागील काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवस पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. या पावसाने मात्र पावसाअभावी सुकत असलेल्या पिकांना जीवदान मिळाले होते. हा पाऊस थांबल्यानंतर आता परत सोमवारी नक्षत्र बदल झाला आहे. आजपासून पूर्वा नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्राच्या सुरुवातीलाच सकाळपासून दुपारपर्यंत रिमझिम पाऊस झाला दुपारी दीड वाजता पाऊस थांबल्यावर सूर्यदर्शन झाले. जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी सकाळी काही वेळ हिंगोली शहर व परिसरात पावसाची भुरभुरी सुरू होती. मात्र लगेच ती थांबली सोमवारी देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाची भुरभुरी देखील सुरू झाली. नंतर बारा ते एक या दरम्यान रिमझिम भिज पाऊस झाला. हा पाऊस हिंगोली शहरासह तालुक्यातील कारवाडी, अंधारवाडी, पिंपळखुटा, डिग्रस, पांगरी, भांडेगाव, बासंबा, सिरसम आदी ठिकाणी झाला. तसेच कळमनुरी शहरासह तालुक्यातील कामठा फाटा, डोंगरगाव, बाळापुर, पोतरा, बोल्डा, येहळेगाव, असोला आदी ठिकाणी झाला. सेनगाव शहरासह तालुक्यातील काही गावात देखील पाऊस झाला. वसमत व औंढा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. हा पाऊस पिकासाठी पोषक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT