after independence wahegaon to muddesh wadgaon road development Sakal
मराठवाडा

Gangapur News : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वाहेगाव ते मुद्देशवाडगावच्या रस्त्यावर डांबर

चकाचक रस्ता होताच वाहेगावच्या ग्रामस्थांची वहिवाट बदलली

बाळासाहेब लोणे

गंगापूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वाहेगाव ते मुद्देशवाडगाव (ता. गंगापूर) असा प्रशस्त रस्ता झाला आहे. त्यामुळे वाहेगाव येथील ग्रामस्थांननी वहिवाटच बदलली असून, पारंपरिक मांजरी (ता. गंगापूर) रस्त्याला फाटा देऊन येथील ग्रामस्थांनी मुद्देशवाडगावची वाट धरली आहे.

आमदार रमेश बोरणारे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सात किलोमीटर अंतराच्या या रस्त्याला सहा कोटींचा निधि मंजूर झाला आहे. पूर्वी वाहेगाव ते मुद्देशवाडगाव अशी पाऊल वाट होती. गाडी बैलाच्या माध्यमातून लोक शेतात जायची.

याच रस्त्यावर अनेक वस्त्या आहेत. त्यांना पावसाळ्यात जाणे-येणे म्हणजे मोठे संकट असायचे. रस्ता झाल्यावर त्यांच्या जीवनात मोठा प्रकाश पडला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना व शेतात जाणार्‍या नागरिकांची देखील सोय झाली आहे.

वाहेगाव ते मुद्देशवाडगाव असा चार किलोमीटरचा रस्ताच नव्हता. गाडी बैलागी वाट होती. पण मुद्देशवाडगाव ते वैजापूर असा तीन किलोमीटर रस्ता तीस वर्षापूर्वी झाला होता. मागील अनेक वर्षापासून हा रस्ता अतिशय खराब होता.

५३ गावातील मोठे गाव

वैजापूर मतदार संघातील ५३ गावातील वाहेगाव मोठे गाव समजले जाते. या गावाला जोडणारा मुख्य रस्ता वाहेगाव ते मांजरी अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर देखील डांबर पडावे अशी मागणी होत आहे. आमदार रमेश बोरणारे यांच्या माध्यमातून ५३ गावात अनेक रस्त्यांचे जाळे घट्ट होत आहे. स्वातंत्र्‍यानंतर अनेक गावांना पहिल्यांदाच रस्ते झालेले दिसत आहेत.

रस्ते चांगले असले तरच माणसांची प्रगती होत असते. आमदार झाल्यावर पहिल्यांदा रस्त्याची वीण घट्ट करायची असा निर्धार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मजबूत साथ कामी आली. त्यामुळे मतदार संघात अनेक रस्त्यांचे कामे पूर्ण करता आली. अजून अनेक रस्ते प्रस्तावित आहेत.

- रमेश बोरणारे (आमदार, गंगापूर वैजापूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT