Walsavangi 
मराठवाडा

दोन दिवसानंतर तरुणाचा मृतदेह सापडला, मासेमारी करताना बुडाला होता पाण्यात

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) : वालसावंगी येथून जवळच असलेल्या पद्मावती प्रकल्पात शनिवारी (ता.तीन) सायंकाळी मासेमारी करण्यासाठी गेलेला तरुण अरुण पवार पाण्यात बुडाला होता. त्याचा शोध बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पथकाला यश आले नाही. दरम्यान सोमवारी (ता.पाच) सकाळी अरुण पवारचा मृतदेह प्रकल्पात पाण्यावर तरंगताना आढळून आला.

अरुण तुकाराम पवार (वय ३२, रा.मासरुळ ता. जि. बुलढाणा) हा तरुण शनिवारी मासेमारी करण्यासाठी भोकरदन तालुक्यातील पद्मावती प्रकल्पात मासेमारी करण्यासाठी गेला होता. परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पद्मावती प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. मासेमारी करताना अरुणला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रकल्पाकडे गेले.

त्यावेळी त्याची दुचाकी चप्पल प्रकल्पाच्या काठावर आढळून आली. यावरून अरुण हा प्रकल्पाच्या पाण्यात बुडला, असा अंदाज लावत ग्रामस्थांनी बुलढाणा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. त्यानंतर य पथकाने पद्मावती प्रकल्पावर दाखल झाले होते. रविवारी (ता.चार) सकाळपासून बोटीद्वारे शोध मोहीम राबविली. मात्र त्यांना यश आले नाही.

रात्र झाल्याने या पथकाने शोध मोहीम थांबवून ते निघून गेले. सोमवारी (ता.पाच) मासरुळ येथील काही ग्रामस्थ अरुणचा काही शोध लागतो का? म्हणून प्रकल्पाकडे गेले असता सकाळी सात वाजेच्या सुमारास ३८ तासानंतर अरुणचा मृतदेह त्यांना प्रकल्पातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती धाड (ता.जि.बुलढाणा ) येथील पोलिस ठाण्यात देण्यात आली असून पुढील प्रक्रिया पोलिस करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT