Tuljapur news esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मराठा समाज पुन्हा आक्रमक! आरक्षण मिळावे,यासाठी वनवास यात्रेस सुरूवात

रुपेश नामदास

तुळजापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापूर ते मुंबई या मराठा वनवास यात्रेस शनिवारी (ता. सहा) येथून प्रारंभ झाला. ६ जूनला ही यात्रा मुंबईला पोचणार आहे.

तुळजाभवानी मंदिरात सकाळी नऊच्या सुमारास यात्रेच्या संयोजकांनी होमकुंडासमोर देवीचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या महाद्वारासमोरून यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी संयोजक योगेश केदार, सुनील नागणे, प्रतापसिंह कांचन पाटील आदींसह सुमारे ४०० नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, अमर परमेश्वर, मधुकर शेळके, अतुल मलबा यांच्यासह कार्यकर्त्यांनी वनवास यात्रेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तुळजापूर शहरातील काही मराठा समाज बांधवांनी हाती फलक घेऊन या यात्रेस विरोध केला.

यावेळी अर्जुन साळुंखे, विशाल रोचकरी, अभिजित कदम, सुदर्शन वाघमारे, विक्की वाघमारे, सत्यजित साठे, दिनेश क्षीरसागर उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केली. तुळजापूर येथून ही यात्रा सोलापूरकडे मार्गस्थ झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे, पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद यांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT