Agitation on tree for transfer  
मराठवाडा

बदलीसाठी झाडावर चढून आंदोलन

प्रकाश काशीद

परंडा : जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार बदली प्रक्रियेसाठी अर्ज देऊनही दखल घेत नसल्याने मानसिक त्रासामुळे येथील पंचायत समिती कार्यालयातील एका चालकाने सोमवारी (ता. 8) झाडावर चढून तासभर शोले स्टाईल आंदोलन केले. 

येथील पंचायत समितीमध्ये विकास रामलिंग चव्हाण (वय 56) हे चालक म्हणून कार्यरत आहेत. येथून बदली करावी म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे वारंवार अर्ज दिले. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडावर चढुन त्यांनी शोले स्टाईल आंदोलन करीत आत्महत्येची धमकी दिली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते झाडावर चढले. त्यानंतर तासभर त्यांचे हे आंदोलन सुरू होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोलिसांनी झाडावर चढून मोठ्या शिताफीने विकास चव्हाण यांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा नवा आयुक्त कोण होणार? ४ IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा; राजकीय-प्रशासकीय हालचाली वाढल्या

पुण्यात अवकाळी पावसाने रस्त्यावर साचलं पाणी, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; रस्ते जलमय

Beautiful People : भारताच्या 'या' टोकावर राहते अशी जमात जिथे लोक जगतात १०० वर्षांपेक्षा जास्त आयुष्य, सत्तरीनंतरही बायका दिसतात तरुण

PNB Scam: माजी लिपिकाचा दोषमुक्तीसाठी अर्ज, पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी न्यायालयात सुनावणी

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारांबळ

SCROLL FOR NEXT