Agriculture  sakal
मराठवाडा

Agriculture : अमेरिकन पद्धतीने सोयाबीन लागवड

चाफनाथ येथे प्रयोग, लागल्या सरासरीपेक्षा दुप्पट शेंगा

संजय कापसे

कळमनुरी : पारंपरिक शेती व बियाण्याच्या वाणामध्ये बदल करीत चाफनाथ येथील एका शेतकऱ्याने अमेरिकन पद्धतीने सोयाबीन लागवड केली. त्याचा त्यांना फायदा झाला असून, त्यांच्या शेतामधील सोयाबीनच्या प्रत्येक रोपट्याला जवळपास ४०० शेंगा लागल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या या सोयाबीन प्लॉटची पाहणी करीत पुढील काळात शेतीमधील बदलाची तयारी चालवली आहे.

तालुक्यातील चाफनाथ येथील शेतकरी माधवराव चौतमल यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये या अमेरिकन सोयाबीन वाणाची लागवड केली. याकरिता त्यांनी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून प्रती किलो हजार रुपये दराने बियाणे विकत घेऊन चार फूट लांबीवर दीड फुटाच्या अंतरावर टोकन पद्धतीने बियाणांची लागवड केली. याकरिता त्यांना एकरी सात किलो बियाणे लागले. सध्या त्यांच्या शेतीतील सोयाबीनच्या प्रत्येक रोपट्याला साधारणपणे ४०० शेंगा लगडल्या आहेत.

सरासरीपेक्षा दुप्पट उत्पन्न देणारा त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न देणाऱ्या या वाणाची माहिती व्हावी याकरिता चाफनाथ येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेकरिता परिसरातील व परजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावून कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन लागवड व बियाणांची माहिती घेतली. यावेळी सूर्याजी शिंदे, संजय नखाते, श्याम वानखेडे, डॉ. वसंतराव पतंगे, बापूराव जाधव, शिवाजी शिंदे, बाबूराव पोळ, गंगाराम पाटील, सुभाष अडकिने, दिगंबरराव कदम, दिगंबरराव बिटरगावकर, सखाराम पांडव, रमेशराव भोयर, डॉ. शरद जाधव, सुदर्शन धुळे, विठ्ठल बेलखेडे, कैलास गुंजकर, गुणानंद पतंगे, शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी डोंगरकडा येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले की सद्यःस्थितीत परंपरागत शेती करताना शेतकऱ्यांना लागवड खर्च व उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. या स्थितीत आधुनिक व संशोधितपणे विकसित झालेल्या अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्याच्या वाणाची शेतकऱ्यांनी लागवड करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा दृष्टिकोन ठेवल्यास शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या माध्यमातून आर्थिक समतोल साधला जाऊ शकतो.

सोयाबीन बियाणांची चार फुटांच्या बेडवर व दीड फुटाच्या अंतरावर टोकन पद्धतीने लागवड केली. सोयाबीनच्या प्रत्येक रोपट्याला जवळपास ४०० शेंगा लगडल्या असून, यामधून सरासरीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.

- माधवराव चौतमल, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT