Folks Artists News 
मराठवाडा

लोककलावंतांना मदतीसाठी हालचाली, राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर

सुशांत सांगवे

लातूर : महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवणाऱ्या वासुदेव, पोतराज यांच्यासह इतर लोककलावंतांना टाळेबंदीमुळे उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. अशीच स्थिती राज्यातील नाटक, चित्रपट, मालिका या क्षेत्रांमधील पडद्यामागील कलाकारांवरही ओढवली आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने अशा कलाकारांना मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे. या कलावंतांना लवकरच मदत मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.


कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीमुळे अनेक घटक आर्थिक अडचणीत आहेत. सरकारचा आर्थिक गाडा रुतलेला असला, तरी काही घटकांना सध्या काही प्रमाणात मदत केली जात आहे. त्याप्रमाणे लोककलावंतांना आणि पडद्यामागील कलाकारांनाही मदतीचा हात मिळावा, अशी मागणी सांस्कृतिक क्षेत्रातून जोर धरू लागली आहे. याबाबतची अनेक निवेदने राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून सांस्कृतिक संचालनालयाला मिळाली आहेत. शिवाय, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनीही याबाबतचे धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक संचालनालयाने मदतीचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविला आहे.


संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे म्हणाले, की सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार आणि तमाशा मंडळ, दशावतार, संगीतबारी, पडद्यामागील कलाकार आदी संघटनांनी आमच्याकडे पाठविलेल्या निवेदनानुसार हा प्रस्ताव तयार केला आहे. पडद्यामागील कलाकारांबरोबरच वासुदेव, वाघ्या-मुरळी, पोतराज, डोंबारी आदी लोककलाकारांना आधार मिळणे सध्या गरजेचे आहे. लोककलेत ४० हून अधिक प्रकार आहेत. ही कला जोपासणारे राज्यातील शेकडो कलाकार टाळेबंदीमुळे आपली कला सादर करूच शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासमोर अडचणी आहेत. प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांची दखल घेतली आहे.


प्रशांत दामलेंकडून लातूरकरांचे कौतुक
पडद्यामागील कलाकारांच्या व्यथा सांगणारे ‘चार घासांतील दोन घास उरवून जगतोय’ हे वृत्त ‘सकाळ’च्या सात मेच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत लातुरातील नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, रजनीगंधा फाउंडेशनने पडद्यामागील कलाकारांना लगेच मदतीचा हात दिला. हे कळताच अभिनेते प्रशांत दामले यांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले. अशी मदत आवश्यक आहेच, पडद्यामागील कलाकार आहेत, म्हणून नाटक आहे. त्यांना सांभाळले तरच नाटक होऊ शकते, अशी प्रतिक्रिया त्यांनी नाट्यस्पंदन प्रतिष्ठान, रजनीगंधा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.


टाळेबंदीमुळे नाटक, चित्रपट, मालिका आदी क्षेत्रांतील पडद्यामागील कलाकारांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. या स्थितीचा अभ्यास करून अशा कलाकारांच्या मदतीसाठी आगामी काळात काय-काय करता येईल, कोणकोणत्या सवलती देता येतील, याबाबतचे धोरण निश्चितच तयार केले जाईल. तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT