Latur News 
मराठवाडा

लातूरकरांच्या फुफ्फुसात प्रत्येक श्वासातून धूळ

सुशांत सांगवे

लातूर : शहरातील वातावरणात गेल्या काही महिन्यांत धुलिकणांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. लातूरकर प्रत्येक श्वासातून धूळ फुफ्फूसात घेत आहेत; पण धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच हवेची गुणवत्ता ढासाळली असून ती आता धोक्याच्या पातळीपर्यंत पोचली असल्याचा धक्कादायक अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रसिद्ध केला आहे.

दिल्लीतील प्रदुषणाची चर्चा सध्या देशात सर्वत्र सुरू आहे. पण कमी-अधिक प्रमाणात वाढत्या प्रदुषणाला महाराष्ट्रातील नागरिकांनाही तोंड द्यावे लागत आहे. लातूरमध्येही वेगवेगळ्या कारणांमुळे सुक्ष्म आणि अतिसुक्ष्म धुलिकणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाशी संबंधीत वेगवेगळ्या आजाराशी सामना करावा लागत आहे.

वातावरणातील धुळीचे प्रमाण कमी होत नसल्याने काहींनी तर रुमाल, मास्क बांधून प्रवास करायला सुरवात केली आहे, असे चित्र शहरात आता सहज पहायला मिळत आहे. लातूरकरांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे बनले आहे.

तीन ठिकाणी होते हवेची तपासणी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गंजगोलाई (व्यापारी भाग), केशवराज विद्यालय (रहिवासी भाग) आणि एमआयडीसी वॉटर वर्क (औद्योगिक भाग) या भागात वातावरणातील हवेचे नमूने घेण्यासाठी हाय व्हॅल्यूम सॅम्पलर ही यंत्रणा कार्यरत आहे.

मंडळाने दयानंद महाविद्यालयाला या प्रकल्पात सहभागी करून घेत तीनही ठिकाणचे वातावरणातील हवेचे नमूने प्रत्येक आठवड्याला जमा करायचे, असे सांगितले आहे. त्यानूसार जमा झालेल्या हवेच्या नमून्यांवरून शहरात धूलिकणाचे प्रमाण वाढले आहे. काही भागात १०० (आरएसपीएम) युनिटची पातळी ओलांडली असल्याचे निष्पण्ण झाले आहे.

मंडळाचे पालिकेला पत्र

शहरातील वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्य कार्यालयाने लातूर महापालिकेला पत्र पाठवून योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना नुकत्याच केल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी  ‘सकाळ’ला दिली. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून योग्य ती खबरदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

प्रदूषणाची प्रमुख कारणे

  • रस्त्यांवरील खड्‌डे, त्यात टाकले जाणारे मुरूम
  • रस्त्यांवरील अस्वच्छता, दररोज सफाई न होणे
  • बांधकामाच्या ठिकाणी ग्रिन नेटचा अभाव
  • रस्त्याकडेला कचरा जाळणे
  • दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT