ajit pawar ajit pawar
मराठवाडा

तोंडाला मास्क नाही, तुमचं अवघड आहे- अजित पवार

अजित दादांची ही पारखी नजर आणि बारीक सारीक गोष्टीवर त्यांचा असलेला कटाक्ष औसेकरांना खूप भावला

जलील पठाण.

औसा (लातूर): कामाच्या आणि शिस्तीच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार किती जागरुक आहेत हे वेळोवेळी त्यांच्या कृतीतून दिसून येते. कोरोनाच्या काळात त्यांनी स्वःतासह आपल्या कार्यकर्त्यांना दिलेले शिस्तीचे धडे सबंध महाराष्ट्राने पाहिले आहेत. याचाच प्रत्यय गुरुवारी (ता. १९) रोजी पुन्हा एकदा औसेकरांनी अनुभवला. निमित्त होते औसा पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पन सोहळ्याचे. अजित पवार जवळ कोणीही नसताना आपल्या केबिनमधून औसेकरांशी संवाद मास्क लाऊन साधत होते तर औसा पालिकेतील पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी त्यांना विनामास्क ऐकत होते. याच गोष्टीला धरत दादांनी एकाच्याही तोंडाला मास्क नाही अवघड आहे बाबा तुमचं... म्हणत नाराजी व्यक्त केली होती.

अजित दादांची ही पारखी नजर आणि बारीक सारीक गोष्टीवर त्यांचा असलेला कटाक्ष औसेकरांना खूप भावला. गुरुवारी दिवसभर शहरातील लोकांमध्ये अजित पवारांनी पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना फटकारल्याची आणि त्यांच्या बारीक नजरेची जो तो चर्चा करताना दिसून आला. कोरोनाच्या संकट काळात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वःतापासून एक शिस्त पाळल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांना गर्दी करुन त्यांचे स्वागत करण्यासाठी फुलांचा हार व गुच्छ देताना काही तरी शिस्त पाळा, कोरोनाची लढाई अशाने कशी जिंकता येईल अशा शब्दात झापले होते.

कोरोनाच्या कालावधीत गेल्या दोन वर्षात त्यांच्या तोंडावरचा मास्क निघालेला कोणीच पाहिला नाही. लोकप्रतिनिधींनी स्वःतापासूनच शिस्त लावायला हवी यावर दादा ठाम आग्रही असतात. ती शिस्त त्यांनी स्वःता तर पाळलीच आहे पण आपल्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पण पाळण्याची नेहमीच सूचना दिली आहे. गुरुवारी औसा पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकापर्ण व शुुभारंभ सोहळा ऑनलाईन पद्धतीने सकाळी संपन्न झाला. यामध्ये औसा पालिकेचे नगराध्यक्षासह विविध पदाधिकारी व मुख्याधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

Dhairyasheel Mane, Ashokrao Mane : खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव मानेंना पंचगंगा प्रदूषण आमंत्रणचं नाही; चिडलेले आमदार माने काय म्हणाले

Kurla News: उलट्या, जुलाब, ताप आणि चक्कर..., कुर्ल्यात मोमोज खाल्ल्यानंतर १६ जणांना विषबाधा

GATE 2027 Registration: आजपासून नोंदणी सुरू; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा आणि परिक्षेची फी

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी नेहा बोरा दाखल, विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतले प्रश्न

SCROLL FOR NEXT