Punjaji Balkhande sakal
मराठवाडा

Accident News : आजारी पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या पतीवर काळाचा घाला; पतीचा जागीच मृत्यू

माहेरी आलेल्या आजारी पत्नीला भेटुन परत जाणाऱ्या पतीवर काळाने घाला घातल्याची घटना डोंगरगाव पुल शिवारामध्ये घडली आहे.

सय्यद अतिक

आखाडा बाळापूर - माहेरी आलेल्या आजारी पत्नीला भेटुन परत जाणाऱ्या पतीवर काळाने घाला घातल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलने पाठीमागून जोराची धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना डोंगरगाव पुल शिवारामध्ये बुधवार ता. २४ घडली आहे.

याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील पुंजाजी सखाराम बलखंडे (वय-३२) हे हिंगोली येथे ऑटो चालविण्याचे काम करतात मागील काही दिवसापासून त्यांची पत्नी आजारी असल्याने ती माहेरी बाळापुर पासून जवळच असलेल्या येलकी येथे आल्या होत्या.

त्यांना भेटण्यासाठी पुंजाजी बलखंडे हे बुधवारी भेटुन परत जात असताना नांदेड हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डोंगरगाव पूल शिवारात पाठीमागून येणाऱ्या मोटरसायकल ने जोरदार धडक दिली ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

त्यांना आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे पांगरा शिंदे, येलकी या गावांवर शोककळा पसरली व दोन्ही गावातील नातेवाईक मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालय परिसरात जमा झाले होते.

पुंजाजी बलखंडे यांच्या पश्चात पत्नी व एक दोन वर्षां चा मुलगा आई-वडील तीन भाऊ एक बहीण असा परिवार आहे. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शविच्छेदन करण्यात आले व प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावी त्यांच्यावर बुधवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.आखाडा बाळापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांचे पुत्र तीर्थंकर घोष यांना अटक केली

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

Sudhagad Crime : सुधागड तालुक्यात चक्क पोलीस पाटलालाच लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT