बाळापूरात दहा दिवसांपासून निर्जळी 
मराठवाडा

आखाडा बाळापूर शहरात दहा दिवसापासून निर्जळी; ग्रामस्थांची होतेय गैरसोय

पाणीपुरवठा कधी सुरु होईल हे सध्यातरी शक्य नसल्याने बाळापुरवासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : येथील शहरात पाणीपुरवठा मागील दहा दिवसापासून बंद असल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

आखाडा बाळापुर शहरावर मोरवाडी २५ गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु वीज वितरण कंपनीची थकबाकी लाखो रुपयाची असल्याने वीज वितरण कंपनीने मागील दहा दिवसापूर्वी २७ लाख रुपये थकबाकी भरा असा कडक पवित्रा घेत वीजपुरवठा बंद केल्याने मोरवाडी पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने दुसरी नळ योजना नसल्याने पावसाळ्यात बाळापूर वासियांचे पाण्यासाठी मोठे हाल होत असून पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.

हेही वाचा - ज्या काळात "भाकरी" साठी उन्ह- थंडी- वारा याची पर्वा न करता घरापासून कोसोदूर ऊस तोडण्याससाठी जावं लागणाऱ्या गेनूबाई व लक्ष्मण चव्हाण दाम्पत्याचा मुलगा हजारो कुटुंबाला राशन देणाऱ्या "ऑर्डर " वर सही करतो

पाणीपुरवठा कधी सुरु होईल हे सध्यातरी शक्य नसल्याने बाळापुरवासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी दररोज वीज वितरण कार्यालयात पंचायत समिती कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु वीज वितरण कंपनीने २७ लाख रुपये भरा तरच वीजपुरवठा सुरु होईल असा पवित्रा घेतल्याने पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरु केले आहे. लवकरच पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्या स्तरावर वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांशी बोलून पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी येथील पदाधिकारी करणार आहेत.

आखाडा बाळापूर येथे विविध करापोटी दीड कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे ग्रामपंचायतच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. ही थकबाकी नागरिक लवकर भरत नसल्याने ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या पगारी व वीज वितरण कंपनी व इतर खर्च करण्याकरिता ही अडचणी येत असल्याची चर्चा आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

UNESCO Kas Plateau : कास पठारावर अवतरला जागतिक स्तरावर दुर्मीळ असलेला 'सातारी तुरा'; समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर उगवणारी 'ही' वनस्पती नेमकी आहे तरी काय?

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास करताय ? चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ...

SCROLL FOR NEXT