Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj  sakal
मराठवाडा

Chhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त अभिवादन

तुषार पाटील

जालना - सातासमुद्रापलीकडे अमेरिकेतील एकेन सिटीमध्ये रविवारी (ता.१९) अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा केला. भोकरदन शहरातील डॉ.आलोककुमार आक्से अमेरिकेत हॉटेल व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवजयंतीसाठी विशेष पुढाकार घेतला हे विशेष.

अमेरिकेतील साऊथ कॅलिफोर्नियातील एकेन शहरात डॉ.आलोक यांचे ‘ताज एकेन’ रेस्टॉरंट आहे. भारतीय खाद्यपदार्थ हे त्यांच्या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य. परिणामी, येथे येणाऱ्या ग्राहकांना भारतीय संस्कृतीविषयी कुतूहल असते.

अमेरिकेतील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, महती कळावी म्हणून यंदा त्यांनी शिवजयंती साजरी करण्याचा निर्धार केला. त्यासाठी महिनाभरापुर्वीपासून तयारी सुरू केली.

शिवजयंतीला लागणारे बॅनर खास भोकरदनवरून मागवून घेतले. भगवे ध्वजाचे कापड त्यांनी अन्य शहरातून विकत आणले. त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांनी शिवजयंतीचे आग्रहाचे निमंत्रण दिले.

त्यास अमेरिकेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रविवारी शिवजयंतीनिमित्त प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची आलिशान रेंज रोव्हरमधून मिरवणूक काढली. कारला भगवे ध्वज लावून, हार घालून सजविण्यात आले.

जवळील ‘ऑडेलविक्स पार्क’ या भव्य उद्यानात आल्यानंतर तेथे एका सजविलेल्या टेबलवर छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली. तेथे आलेल्या जवळपास शंभर अमेरिकन नागरिकांना त्यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याची, लढ्याची माहिती दिली.

शिवाय भारतीयांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना देवतेचा दर्जा असल्याचे सांगितले. भारतीय नौसेनेचे छत्रपती शिवराय जनक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर नागरिकांनी प्रतिमेस अभिवादन केले, अनेकांनी सहकुटुंब सेल्फीही काढल्या.

मोफत भोजनाची व्यवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांची रेस्टॉरंटमध्ये प्रतिमा ठेवण्यात आली. तेथे येणाऱ्या ग्राहकांनीही छत्रपती शिवरायांबाबत माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे ग्राहकांनी प्रतिमेस मानाचा मुजरा केला. शिवजयंतीनिमित्त ग्राहकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली. यानिमित्त आवर्जून महाराष्ट्रीय तसेच भारतीय खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. अनेकांनी मनापासूनच त्याचा आस्वाद घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो. मी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना शिवजयंती साजरी करण्याची सुरुवात केली होती.

तेव्हा शिवरायांची भवानी तलवार पाहण्‍यासाठी लंडनच्या म्युझियममध्येही मी गेलो होतो. अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून मी यंदा खास छोटेखानी शिवजयंतीचा सोहळा घेतला.

आलोककुमार आक्से व्यावसायिक, एकेन सिटी, युएस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT