Classes War Beed sakal
मराठवाडा

बीड : एवढंच राहिलं होतं, बीडमध्ये ‘क्लासेस वॉर’

खासगी क्लासेसचालकाच्या कानाला लावले पिस्तूल

सकाळ वृत्तसेवा

बीड : वाळू माफियागिरी, जमीन माफियागीरीच्या प्रकारांनी जिल्हा ढवळून निघाला आहे. खून, दरोडे, चोऱ्या, अत्याचारांच्या घटनांचाही आलेख वाढताच आहे. आता कमी की काय म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रातही खासगी शिकवणी चालकांतील वॉर समोर आले आहे. येथील खासगी शिकवणी चालकाला लातूरच्या दोघांनी कानाला पिस्तुल लावल्याची घटना बुधवारी (ता. दोन) घडली. शाहू नगर परिसरात घडलेल्या घटनेवरुन गुरुवारी (ता. तीन) या प्रकरणी लातूरच्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. कोरोना संसर्गामुळे ऑनलाइन शिक्षणाकडे कल वाढला आहे. यातूनच खासगी शिकवणी चालकांतील व्यावसायिक स्पर्धा टोकाला पोहोचली आहे.

हर्षल भास्करराव केकाण (रा. डीपी रोड, बीड) हे खासगी कोचिंग क्लासेस घेतात. शहरातील शाहूनगरातील एका इमारतीमध्ये त्यांचे शिकवणी वर्ग आहेत. त्यासमोरच लातूर येथील पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे यांचा खासगी शिकवणी वर्ग आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजता हर्षल केकाण हे आपल्या क्लासेसमधील दालनात होते. यावेळी पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे यांनी त्यांना दुसऱ्या खोलीत कोंडून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केकाण यांनी तो चुकविला. त्यानंतर गावठी पिस्तुल लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. याप्रकरणी हर्षल केकाण यांच्या फिर्यादीवरुन पंकज तांबारे व श्रीनिवास तांबारे यांच्यावर शिवाजीनगर ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदार प्रवीण पाथरकर तपास करत आहेत.

शिकवण्यांकडे प्राप्तिकरचे दुर्लक्ष

जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्गांची मोठी संख्या वाढली आहे. अनेक शिकवणी चालक भरमसाठ शुल्क आकारात आहेत. मध्यमवर्गीयांना शिकवणी गरजेइतकाच प्रतिष्ठेचाही विषय झाला आहे. मात्र, यातून खासगी शिकवणी चालकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा सरकार दरबारी कुठलाच हिशोब नाही. सादर केलेल्या ताळेबंदामध्येही मोठी तफावत आहे. विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याच्या पावत्याही दिल्या जात नाहीत आणि त्याची मूळ नोंदही लपवली जाते. याकडे प्राप्तिकर विभागानेही लक्ष देण्याची गरज आहे.

व्यावसायिक स्पर्धा टोकाला

विज्ञानातील भौतिकशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन हर्षल केकाण व तांबारे बंधूंच्या शिकवणी वर्गांमध्ये स्पर्धा आहे. यातून त्यांच्यात अनेक दिवसांपासून छुपा संघर्ष आहे. यातूनच गावठी पिस्तूलापर्यंत हे प्रकरण गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT