file photo
file photo 
मराठवाडा

जमीन वाटप (पोट हिस्सा) करणे झाले सोपे...कसे ते वाचा...

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सात- बारावरील सर्व जमीनधारकांची संमती असल्यास भुमिअभिलेख विभाग सर्व धारकांनी संमती दिल्याप्रमाणे नकाशा तयार करुन देणार आहे.

जामाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख पुणे यांच्या परिपत्रकानुसार सर्व संमतीने पोट हिस्सा नकाशा व स्वतंत्र सात- बारा करता येणार आहे. या पुर्वी पोट हिस्सा करण्यासाठी अर्जदाराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर जागेवर जावुन मोजणी करुन पोट हिस्सा नकाशा तयार केला जात असे. आता मात्र सर्व सहधारकानी संमतीने पोटहिस्सा अर्ज केल्यास मुळ अभिलेखाची खात्री करुन सर्व सहधारकांची संमतीने दाखल केलेल्या नकाशा व सात- बारावरील क्षेत्राप्रमाणे कार्यालयात पोट हिस्सा नकाशा तयार करता येणार आहे.

ही कागदपत्रे देणे आवश्यक आहे 

पोटहिस्सा मोजणी करण्यासाठी सर्व सहधारकाची स्वाक्षरी असलेला असलेला अर्ज ‘ई मोजणी ‘ व्दारे ऑनलाईन भरुन घेतला जाणार. या अर्जावर साधी मोजणी फी आकारणी केली जाईल. एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी किंवा संमती नसल्यास पोटहिस्सा करता येणार नाही. गट नंबर व सर्व्हे नंबरचे सर्व सात- बारा (तिन महाचे आतील.) धारण जमिनीमध्ये कसे पोटविभाग करवयाचे आहेत, ते दर्शविणारा सर्व सहधारकांच्या स्वाक्षरी असलेला कच्चा नकाशा, तसेच  सात- बारा वेगळा झाला असल्यास गाव नमुना सहा “ड”  मधील कच्चा नकाशा. या नकाशा प्रमाणे प्रत्येक भोगवटादार यांच्या कब्जे वहिवाटीत असलेले अंदजित क्षेत्र व अधिकार अभिलेखत असलेल्या क्षेत्राचा तपशील, तसेच सामायिक क्षेत्रात विहीर, बोअरवेल, वस्ती व झाडे यांचा तपशील देणे आवश्यक आहे. भोगवटादार यांनी ओळख पटवण्यासाठी फोटो ओळखपत्राची स्वसांक्षांकित छायाप्रत देणे आवश्यक आहे. सदरचे ओळखपत्र हे सरकारने दिलेले अधिकृत फोटो ओळख पत्र असणे आवश्यक आहे.

एकत्रीत फोटो मोबाईल किंवा अन्य कॅमे-याव्दारे
 
याप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यास उपअधिक्षक भुमि अभिलेख यांच्याकडुन सर्व सहधारकांना नोटिस दिली जाईल. कच्चा नकाशा आणि क्षेत्राचा तपशील सर्व सहधारक यांना मान्य असल्यास जबाब उप अधिक्षक भुमि अभिलेख यांच्यासमोर इनकॅमेरा नोंदवला जाईल. जबाब घेताना अधिकारी आणि सर्व सहधारकांचा एकत्रीत फोटो मोबाईल किंवा अन्य कॅमे-याव्दारे घेतला जाऊन, त्याची नोंद ठेवण्यात येणार आहे. एखाद्या प्रकरणात चौकशीची गरज भासल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक महिन्यात प्रक्रिया पुर्ण केली जाईल. चौकशीची गरज नसल्यास सात दिवसात कार्यवाही होईल. संमतीने पोटहिश्याची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर व तो लागु झाल्यानंतर संबधीत धारकास आवश्यक वाटल्यास त्यांचे पोटहिस्साची हद्द कायम करण्यासाठी कार्यालयाकडे स्वतंत्र मोजणी अर्ज करता येईल.

जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख कार्यालयाचे आवाहन

सात- बाराप्रमाणे स्वतंत्र नकाशा करुन घेण्यासाठी सहधारकांनी संमतीने पोटहिस्सासाठी आपल्या तालुक्यातील उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयास संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख नांदेड यांनी केले आहे.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT