फोटो 
मराठवाडा

आधिच मंदी त्यात संचारबंदी...! कुठे ते वाचा...?

सकाळ वृत्तसेवा

परभणी: कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या चार महिण्यापासून बाजारपेठ सातत्याने बंद राहत आहे. लॉकडाऊनचे तीन महिणे व नंतर अनलॉक करून सुध्दा जिल्ह्यात सातत्याने लागू होणाऱ्या संचारबंदीमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बाजारपेठ सतत बंद राहत असल्याने व्यवहार कसे पुर्ण करावेत? हा प्रश्न व्यापाऱ्यांना आता सतावू लागला आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्ग झालेल्या रुग्णात गेल्या आठ दिवसापासून वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्कता बाळगत आहे. लोकांचा संपर्क कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार निरनिराळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. त्यात गेल्या चार दिवसापासून संचारबंदी लागू कऱण्यात आली आहे. परंतू या संचारबंदीमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सतत बाजारपेठ बंद राहत असल्याने त्यांचे व्यवहार पूर्ण कसे होणार याची चिंता त्यांना लागून राहीली आहे. सततच्या बंदमुळे शहरातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - खरिपाच्या पेरणीला मोसमी पावसाची साथसंगत
 
व्यापाऱ्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत

मोठ्या व्यापाऱ्यांचे नुकसान लाखोत असले तरी दररोज कमाई करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचे मात्र मोठे वांदे झाले आहेत. यामुळे बाजारपेठ सुरु ठेवावी अशी मागणी आता व्यापाऱ्यामधून होत आहे. सतत इतके दिवस बाजारपेठ बंद ठेवणे शक्य नसल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये अशी ही मागणी करण्यात येत आहे.

बाजार बंद तरीही नागरीकांचा मुक्तसंचार

एकीकडे शहरात संचारबंदी लागू करून प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवली आहे. परंतू याचा विपरित परिणाम दिसून येत आहे. एकीकडे बाजारपेठ बंद तर दुसरीकडे संचार बंदी असतांनाही सर्वसामान्य लोक मात्र मोटारसायकलवरून बाजारात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. ही गर्दी थांबली पाहिजे या दृष्टीने प्रशासाने पावले उचलने गरजेच आहे.

प्रशासनाचे धोरण चुकीचे

आधी तीन महिण्याचे लॉकडाऊन व त्यानंतर सातत्याने संचारबंदीचे भूत व्यापाऱ्यांच्या मानगुटीवर बसवले जात आहे. एकीकडे व्यापाऱ्यांच्या गळ्याला सुरा ठेवायचा तर दुसरीकडे लोकांच्या शहरातील मुक्तसंचारावर धाक नाही हे धोरण चुकीचे आहे. बाजारपेठ संपविण्याचा घाटच प्रशासनाने घातला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. हा प्रकार थांबला पाहिजे.
- सूर्यकांत हाके, जिल्हाध्यक्ष, व्यापारी महासंघ, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२२ कॅरेट सांगून विकलं जातंय २० कॅरेट सोनं? रेनियम पावडरच्या भेसळीची चर्चा, सराफा बाजारात खळबळ!

Pakistan Cricket: बाबर आझमला मोठा धक्का! रिझवान-इमामचा पत्ता कट, PCB ने बदलली कॉन्ट्रॅक्टची पद्धत; ३८ खेळाडूंची नवी यादी जाहीर

BrahMos Missile: 'ब्रह्मोस'ला जगभरातून मोठी मागणी! वेळेपूर्वीच भारत करणार ५० हजार कोटींची विक्री

रेल्वेत 2,861 पदांसाठी भरती; 15 वर्षे वय असलेल्या तरुणांनाही अर्ज करण्याची संधी! परीक्षा-मुलाखतीशिवाय डायरेक्ट मेरिटवर निवड

Raigad: रायगडकरांना दिलासा! जिल्ह्यातील धरणे ९० टक्क्यांहून अधिक फुल्ल, पाहा सध्याची आकडेवारी

SCROLL FOR NEXT