vaishanvi. 
मराठवाडा

आजीसाठी ती सर्वकाही...तिने केलं आजीच्या कष्टाचं चीज...सहाव्या वर्षी हरवले होते वैष्णवीच्या मायेचं छत्र ... 

संगमेश्‍वर जनगावे

चाकूर (लातूर) : बाल वयातच आई वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे मावशी व आजी आजोबांनी बार्शीच्या वैष्णवीचा सांभाळ केला. हीच वैष्णवी उल्हास पोटे चाकूरच्या जगत् जागृती विद्या मंदिरातून दहावीला ९८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बार्शी येथे वैष्णवीच्या सहाव्या वर्षी आई रंजनाचा मृत्यू झाला तर वडील उल्हास दहा वर्षाची असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अहमदपूर येथील योजना मलशेट्टे या मावशीने यशवंत विद्यालयात पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. तर पाचवीपासून दहावीपर्यतचे शिक्षण चाकूर येथील जगत् जागृती विद्या मंदिरात आजी सुशिलाबाई व आजोबा विश्वनाथ शेटे यांनी पुर्ण केले. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीने असा शैक्षणिक प्रवास करत शालांत प्रमाणपत्र परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवत अठ्यान्नव टक्के गुण घेतले आहेत. 

आई बाबा मी पास झाले हे सांगण्यासाठी आई वडील नाहीत, म्हणून ती खचली नाही. तर आजी आजोबा व मावशीच माझ्यासाठी सर्वस्व आहेत, असे ती म्हणते. भविष्यात डाॅक्टर होऊन पैसे कमावण्याला प्राधान्य न देता ते एक सामाजिक कार्य आहे. असा पायंडा पुन्हा एकदा समाजात निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मोठ्या अभिमानाने वैष्णवीने सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात ढगाळ वातावरण

SCROLL FOR NEXT