अंबड : जालना जिल्हयातील अंबड शहरातील न्यायलगत असलेली जिल्हा परीषद प्रशालेची सन 1967 मध्ये बांधलेली इमारत पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. जीर्ण झालेल्या इमारतीला पूर्णपणे तडे गेले आहे.या इमारतीच्या वर्ग खोल्यांची पडझड झाली आहे. एकवेळा वर्गखोली जळून कोळशा झाला आहे. सध्या वादळ, वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने भिंत पडली आहे.या बाजूलाच पाठीमागे मुलींचे स्वच्छतागृह असल्याने व मुलींची वर्दळ सुरूच असते.
यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहचत आहे.जुनी, धोकादायक व जीर्ण झालेली इमारत पाडण्याबाबतचा ठराव जालना जिल्हा परीषदच्या सर्वसाधारण सभेत (ता.30 नोव्हेंबर 2011) ठराव क्रमांक 344 व (ता.17 जुलै 2012) चा ठराव क्रमांक 17 नुसार सदरची इमारत पाडण्याबाबतची मंजुरी देण्यात आली आहे. गत दहा ते बारा पासुन इमारत पाडण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. इमारतीचा काही भाग पावसामुळे पडला आहे.यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि इमारत तात्काळ पाडणे गरजेचे असल्याची पत्राद्वारे लेखी मागणी प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश गवई यांनी जालना जिल्हा परिषदेचे उपअभियंता,कार्यकारी अभियंता अभियंता जालना, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परीषद जालना यांच्याकडे मागणी केल्याचे गवई यांनी सांगीतले.
जिल्हा परिषद शाळेने घडविले अनेक नामवंत विद्यार्थी: शहरातील जिल्हा परिषद प्रशालेची स्थापना सन 1967 मध्ये झाली. हि प्रशाला एकेकाळी नामवंत म्हणुन सर्वत्र परिचित होती.या प्रशालेने वकील, डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, सी.ए.सह आदी नामवंत विद्यार्थी व आदर्श नागरीक घडविले आहे.