Amdabas Danve Sandipal Bhumbre 
मराठवाडा

Amdabas Danve: महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापणार? आंबादास दानवेंनी भुमरेंबद्दल केले 'हे' विधान

Sandipan Bhumbre: राजशक्तीची ताकद असली तरीही संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला लढायचे असल्याचे आवाहन दानवे यांनी शिवसैनिकांना केले.

मुनाफ शेख

Marathawada: पैठण विधानसभा मतदार संघाची गद्दाराला गाडायची परंपरा राहिली आहे. १९९० साली येथे गद्दारी झाली होती परंतू निष्ठावंत शिवसैनिकांनी ही चुक दुरुस्त करून १९९५ साली पुन्हा शिवसेनेचा आमदार निवडून आणला होता.आगामी विधानसभा निवडणुकीत ही असेच आपल्याला कार्य करायचे असून येथील गद्दारी मिटवायची असल्याची सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली.गुरुवार ता. १८ जुलै रोजी आडुळ येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते.

पैठण विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तसेच जिल्ह्याचे ते खासदारही नाहीत.यामुळे त्यांना पैठणमध्ये जनता दरबार घेण्याचा कसलाही अधिकार नाही. निवडणूक झाली नसल्याने कसले अधिकार नसताना पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या दालनाला कुलूप लावा. तसेच पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भुमरे पिता पुत्राच्या दबाव तंत्राला घाबरू नये अशा सूचना दानवे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

मतदारसंघातील आडुळ, पाचोड, विहामांडवा व दावरवाडी जिल्हा परिषद विभागांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने दानवे यांनी बैठका घेतल्या. बूथनिहाय शिवसेना संघटना मजबूत करण्यात यावी तसेच पिक विमा, दुष्काळी अनुदान व शेतपिक नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात यावे. वैयक्तिक प्रश्नांच्या वरती जाऊन सार्वजनिक हितांच्या कामासाठी कार्य करावे अशी सूचना अंबादास दानवे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केली.

स्थानिक आमदारांनी गद्दारी केलेली असली तरीही आजच्या बैठकीस ९९ टक्के पदाधिकारी उपस्थित असल्याचा आनंद आहे.विधानसभा निवडणुकीत धनशक्ती व राजशक्तीची ताकद असली तरीही संपूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला लढायचे असल्याचे आवाहन दानवे यांनी शिवसैनिकांना केले.

पाणी टँकर, पिक विमा, दुष्काळ अनुदान व नुकसान भरपाई असे शेतकऱ्यांचे प्रश्नही दानवे यांनी यावेळी मार्गी लावले.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख अंकूश रंधे, दत्ता गोर्डे, संतोष जेजूरकर, तालुकाप्रमुख मनोज पेरे, विधानसभा संघटक बद्रीनारायण भुमरे,अक्षय शिसोदे, पी.आर थोटे, सुरेश दुबाले, शहरसंघटक सचिन तायडे,जिल्हा युवाधिकारी शुभम पिवळ,महिला आघाडी जिल्हा संघटीका राखीताई परदेशी व तसलिम शेख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT