मराठवाडा

अंबानगरीची महती जाणार आंतरराष्ट्रीय स्तरावर

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई  - राहुल नरवणे यांनी तयार केलेल्या ‘मनोहर अंबानगरी’ या शॉर्टफिल्मची रशियातील मॉस्को येथे होणाऱ्या ‘इको फिल्म फेस्टिवल-ब्रिक्‍स २०१७’साठी निवड झाली आहे. त्यामुळे या शहराचे ऐतिहासिक व पौराणिक वैभव आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आहे. तेरा मिनिटांच्या या लघुपटात शहरातीलच कलाकार आहेत. 

उजनी (ता. अंबाजोगाई) येथील राहुल नरवणे यांनी भारतीय विद्याशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. ऑर्किऑलॉजीचाही त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी त्यांनी धर्मापुरी येथील केदारेश्‍वर मंदिरावरही लघुपट तयार केला असून त्याला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 

अंबाजोगाईच्या इतिहासाची ओळख सर्वदूर व्हावी, या उद्देशाने नरवणे यांनी तीन वर्षांपासून ‘मनोहर अंबानगरी’ लघुपटाचा उपक्रम सुरू केला. त्यात अंबाजोगाई परिसरातील विविध ऐतिहासिक मंदिरे, निसर्ग सौंदर्य व लेण्यांचा समावेश आहे. हा लघुपट एक तासाचा असून, फिल्म फेस्टिवलसाठी तो १३ मिनिटांचा आहे. या प्रकल्पासाठी चार लाख रुपये खर्च आल्याचे नरवणे यांनी सांगितले. लघुपटात पंचमवेद अकादमीचे विनोद निकम व त्यांच्या अकादमीच्या नृत्य कलावंतांचा समावेश आहे. नामदेव गुंडाळे यांनीही काम केले आहे. राधेश कुलकर्णी, मैत्री ग्रुपचे अभिजित जोंधळे यांनी सहकार्य केले आहे. या लघुपटाची ‘ब्रिक्‍स २०१७’ मध्ये निवड झाली आहे. ब्रिक्‍स ही पाच देशांची परिषद असून त्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. ‘टीव्ही. ब्रिक्‍स’ या वाहिनीच्या माध्यमातून हा लघुपट या पाच देशांतही दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मनोहर अंबानगरी’ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचणार आहे. दरम्यान, ‘मनोहर अंबानगरी’ या नावाने नरवणे यांनी फेसबुक पेजही सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी वाटोळं केलं', आझाद मैदानात सुप्रिया सुळेंना आंदोलकांनी घेरलं; गाडीवर पाणी बॉटल फेकल्या, VIDEO VIRAL

"या मुलीला मी मनापासून लेक मानलं" प्रियाच्या निधनाच्या बातमीने दिग्दर्शक विजू माने हळहळले; पोस्टमधून कलाकारांची श्रद्धांजली

PM मोदींना जिनपिंग यांनी दिली स्वत:ची कार, पुतीन रशियातून गाडी घेऊन आले पण नंबर प्लेट चीनची

Latest Marathi News Live Updates : आरक्षणासाठी मराठा आंदोलकाचं चिखल मातीत लोटांगण

PKL 2025: ‘टाय-ब्रेकर्स तुमच्या संयमाची परीक्षा घेतात, आणि त्यातूनच आम्ही सामना जिंकलो’, यू मुम्बाचा कर्णधार सुनील कुमार

SCROLL FOR NEXT