NND14KJP01.jpg 
मराठवाडा

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. आंबेडकर जयंती साजरी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडून अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. १४) सकाळी साडेदहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे आदी उपस्थित होते. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात जयंती 
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे, सहायक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम वाघमारे, पोलिस जमादार सुर्यभान कागणे, महिला पोलिस कर्मचारी शुभांगी कोरेगावे यांच्यासह विधी शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नांदेड पंचायत समितीकडून कापडी मास्कचे वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड पंचायत समितीमध्ये सभापती कावेरी वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसभापती ॲड. राजू हाटकर, बालाजी सूर्यवंशी, गटविकास अधिकारी  यु. डी. तोटावाड आदी उपस्थित होते. कोरोना विषाणूमुळे सामाजिक अंतर राखून कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी महिला बचत गटांच्या महिलांनी बनविलेल्या कॉटन कापडी मास्कचे तीस कर्मचाऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. 

स्वच्छता राखण्याचे आवाहन 
सार्वजनिक आणि वैयक्तीक स्वच्छता राखण्यात यावे असा संदेश देण्यात आला. प्रा. इरवंत सुर्यकार यांनी प्रस्ताविक केल. कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी श्रीधर आडे, विस्तार अधिकारी डी. के. आडेराव, बी. एस. गलांडे, एम. एस. बोर्डे, गजानन मठपती, एस. व्ही. गायकवाड, श्रीकांत पांडे, के. सी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

भाजीपाला विक्रेत्यांना कापडी मास्कचे वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीच्या निमित्ताने रयत सेवाभावी संस्थेच्यावतीने भाजीपाला विक्री करणारे, गाडीवाले, पोलीस हवालदार याना कापडी मास्कचे वाटप करण्यात आले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना, पदाधिकारी यांना ही मास्कचे वाटप करण्यात आले आणि जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या या मध्ये प्रा. इरवंत सुर्यकार, संचालक रयत सेवाभावी संस्था, योगेश टोमके, चंद्रकांत मेटकर आदी स्वयं सेवकांनी काम केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT