Bidkin Traffic Jam esakal
मराठवाडा

Pregnant Women : गर्भवती महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याकरता येत होती रुग्णवाहिका, पण रस्त्यात...

बालानगर येथे रुग्णवाहिका सेवा १०८ ला आलेल्या अत्यावश्यक फोनमुळे गर्भवती महिलेला उपचारासाठी घेऊन येण्यासाठी ही रूग्णवाहिका जात होती.

सकाळ डिजिटल टीम

जलवाहिनीच्या कामाला वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

बिडकिन : ग्रामीण रुग्णालय बिडकिन (Rural Hospital Bidkin) अंतर्गत येत असलेल्या बालानगर येथे एका गर्भवती महिलेला (Pregnant Women) उपचारासाठी घेऊन येण्यासाठी जात असलेल्या रुग्णवाहिका (Ambulance) सेवा १०८ ला तब्बल अर्धा तास वाहतुकीच्या कोंडीत थांबावे लागले. ही घटना आज निलजगाव फाटा परिसरात घडलीये.

बालानगर येथे रुग्णवाहिका सेवा १०८ ला आलेल्या अत्यावश्यक फोनमुळे गर्भवती महिलेला उपचारासाठी घेऊन येण्यासाठी ही रूग्णवाहिका जात होती. दरम्यान, जलवाहिनीच्या कामाला वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने जड वाहनांना बंदी घालून दिली होती.

मात्र, जीव्हीपीआर व इतर कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर आणि भरधाव वेगाने येत-जात असल्याने बिडकिनमधील निलजगाव फाटा ते शेकटा फाटा आणि बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर जड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. जड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागत आहेत. तरी, ही जड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC घोटाळा उघड करणार असल्यानं मला निलंबित केलं, आरोग्य उपसंचालिका गायकवाड यांचे खळबळजनक आरोप

सैफ अली खान इन्स्टाग्रामवर आला अन् सर्वप्रथम करीनालाच फॉलो केलं; पहिल्या पोस्टमध्ये असं काय की, लोक करताय चर्चा

Rohit Sharma MI Captain: रोहित खरंच, Mumbai Indians चा कर्णधार होणार का? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Maharashtra Live News : सोलापूर शहरावरील पाणी कपातीचे संकट टळलं, शहरातील पाणीपुरवठा राहणार सुरळीत..

Rahuri News: पतीचा दवाखाना सुरू करायला २० लाख माहेरून आण, डॉक्टर महिलेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT