Sanjay Jadhav sakal
मराठवाडा

Sanjay Jadhav : खासदार जाधवांना परभणी जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्याची संधी

मतांच्या ध्रुवीकरणामुळे लोकसभेच्या परभणी मतदारसंघात खासदार संजय जाधव सलग तिसऱ्यांदा निवडून आले. यापूर्वी दोनदा आमदार आणि दोनदा खासदार राहिलेल्या जाधव यांनी या वीस वर्षांत केले तरी काय, असा निवडणूक काळात विरोधकांनी तर आता सर्वसामान्यांतून सूर व्यक्त होत असल्यामुळे नव्याने मिळालेल्या पाच वर्षांत त्यांची जबाबजारी कैक पटीने वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मतांच्या ध्रुवीकरणामुळे लोकसभेच्या परभणी मतदारसंघात खासदार संजय जाधव सलग तिसऱ्यांदा निवडून आले. यापूर्वी दोनदा आमदार आणि दोनदा खासदार राहिलेल्या जाधव यांनी या वीस वर्षांत केले तरी काय, असा निवडणूक काळात विरोधकांनी तर आता सर्वसामान्यांतून सूर व्यक्त होत असल्यामुळे नव्याने मिळालेल्या पाच वर्षांत त्यांची जबाबजारी कैक पटीने वाढली आहे. त्यांच्या अख्त्यारीतील विषयांवर गंभीरपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. दर्जेदार शिक्षणासह रेल्वेचे रखडलेले प्रश्न, जिल्ह्यातील उद्योगांना लागणाऱ्या सोयी सुविधा यावर त्यांना काम करावे लागणार आहे. विशिष्ट मतांवर निवडून आलो असे आता त्यांना म्हणता येणार नाही. सर्व सामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आता आगामी पाच वर्षात प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार हे मात्र निश्चित आहे.

कृषीपूरक उद्योगावर भर हवा

या मतदारसंघात सर्वाधिक भाग हा परभणी जिल्ह्याचा आहे. विधानसभेच्या जिल्ह्यातील चार मतदारसंघांचा यात समावेश होतो. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी जाधव यांना प्रयत्न करावे लागतील. हा जिल्हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो. काही वर्षांपासून सोयाबीन व कपाशीचा या नगदी पिकांचा पेरा वाढला आहे. जवळपास ९० टक्के शेतकरी याच पिकांवर अवलंबून राहतो. परंतू, वारंवार निसर्गाच्या अवकृपेमुळे या त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेत. त्यामुळे कृषी पुरक उद्योगांची उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. येथे कृषी विद्यापीठ आहे. या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ञ शास्त्रज्ञांची मोठी उपलब्धता आहे. त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा सकारात्मक उपयोग कृषी पुरक उद्योग उभारणीसाठी करता येऊ शकतो.

बेरोजगारीचा प्रश्न

जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने बेरोजगारांची संख्या मोठी आहे. रोजगारासाठी तरूण सरळ मुंबई - पुण्याला धाव घेतांना दिसत आहेत. परिणामी हा जिल्हा दिवसेदिवस मागासेलला म्हणून समोर येत आहे. यासाठी औद्योगिकरण वाढविण्याचे आव्हान असेल.

दर्जेदार शिक्षणासाठी संस्थांची गरज

जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणाची वानवा आहे. या ठिकाणी एक कृषी विद्यापीठ सोडले तर कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी कोणतीही सोय उलपलब्ध नाही. केवळ आयटीआय व शासकीय तंत्रनिकेत या दोन संस्था असल्या तरी त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर कायम प्रश्न चिन्ह निर्माण केले जाते. खासगी शिक्षण संस्थांचे शुल्क पालकांना न परवडणारी आहे. त्यामुळे केंद्र स्तरावरील काही कौशल्यावर आधारित शिक्षण देणाऱ्या संस्था जिल्ह्यात कार्यान्वित करण्यासाठी पावले पडण्याचीगरज आहे.

आरोपांकडे गांभीर्याने पाहावे लागेल

संजय जाधव हे गेल्या २० वर्षापासून जिल्ह्याचे नेतृत्व करतांना दिसत आहेत. पूर्वीचे १० वर्षे परभणीचे आमदार व नंतरचे दहा वर्षे खासदार म्हणून विजयी झाले. आता ते तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान झाले आहेत. मिळालेल्या दीर्घ कालावधीत खासदार जाधवांनी काहीच विकास केला नाही, असा स्पष्ट आरोप विरोधकांसह सर्वसामान्य मतदारांकडून केला जात आहे. त्यामुळे आत्मपरिक्षण करून विकास कामांच्या माध्यमातून त्यांना मतदारांच्या आरोपांना उत्तर द्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Nitin Gadkari : RSS-BJP मध्ये मतभेद? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड का लांबतेय? नितीन गडकरी म्हणाले, 'तुम्ही चुकीच्या व्यक्तीला...'

Solapur News: 'मोहोळ तालुक्याला चार नद्यांच्या पुराचा वेढा'; सीनेने अनेक ठिकाणी पात्र बदलले; भीमा, भोगावती, नागझरीलाही पूर

Plastic Use and Brain Health Alert: दररोजच्या प्लास्टिकमुळे वाढतायत मेंदूविकार; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT