मराठवाडा

Chh. Sambhajinagar : आम्हाला कौशल्य दाखविण्याची संधी; अवैध दारू कारवाई गाजवणाऱ्या महिला अंमलदारांची भावना

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : छावणी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी एक वेगळाच प्रयोग करताना महिला अंमलदारांची पथके तयार केली आणि अवैध दारू विक्री धंद्यावर एकाच वेळेस धाडी टाकण्याच्या सूचना केल्या. महिला अंमलदारांनी धाडी टाकून केवळ अर्ध्या ते पाऊस तासात चौघांना ताब्यात घेऊन दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विशेष म्हणजे ‘आम्हालाही आमचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाल्याची’ भावना महिला अंमलदारांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यातील विशेष पथकाचे उपनिरीक्षक पुंडलिक डाके यांना भीमनगर, भावसिंगपुऱ्यात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन निरीक्षक कैलास देशमाने यांच्या सूचनेनुसार अवैध दारूविक्रीच्या धंद्यावर छापा मारण्यासाठी महिला पोलिस अंमलदारांचे चार पथक नेमण्यात आले.

यानंतर पथक एकमधील मीना जाधव, अरुणा वाघेरे या महिला अंमलदारांनी भावसिंगपुऱ्यातील मनोज रामभाऊ राऊत (३४) याच्या घरात छापा मारत २ हजार ९४० रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त केला.

तर पथक दोनमधील महिला अंमलदार सुमन पवार, सविता लोंढे यांनी भिमननगरातील आकाश प्रकाश अवसरमोल (३०) याच्या घरात छापा मारुन त्याच्या ताब्यातून दोन हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पथक क्र. तीनमध्ये विशेष पथकाचे उपनिरीक्षक पुंडलिक डाके यांच्यासह वैशाली चव्हाण यांचा समावेश होता. आशिष रणजित खरात (२४, रा. तांबे गल्ली, भीमनगर भावसिंगपूरा) याच्या घरात छापा मारत एक हजार ६२५ रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली.

पथक चारच्या अंमलदार ज्योती भोरे, अंमलदार प्रियंका बडुगे यांच्या पथकाने रोहीत कल्लू शिर्के (२८, गल्ली क्र. एक, भीमनगर भावसिंगपूरा) याच्या घरात छापा मारत दोन हजार ६६० रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. दरम्यान, यावेळी महिला पथकासाठी एक पुरुष उपनिरिक्षक सोबत देण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT