परभणी : परभणीत आढळलेला त्या २१ वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा दुसरा स्वॅब अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे परभणीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परंतू या रुग्णाचा आता २४ तासाचा एक स्वॅब नमुना घेतला जाणार असून त्यानंतर त्याची घोषणा केली जाणार आहे.
परभणी शहारतील एमआयडीसी भागात पाहूणा म्हणून आलेल्या एका २१ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे ता. १३ एप्रिल रोजी निष्पन्न झाले होते. परभणी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत ग्रीन झोनमध्ये असतांनाही हा रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. परंतू, येथील जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या पथकाने सातत्याने या तरूणांच्या प्रकृतीची काळजी घेत योग्य ते उपचार सुरु ठेवले. त्याची प्रकृती दिवसेदिवस चांगली होत असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.
हेही वाचा व पहा - Video : ‘ध्यान देऊन ऐका जरा... आला कोरोना’
२८ जणांचे स्वॅब दुसऱ्यांदाही निगेटीव्ह
या तरूणाच्या संपर्कात आलेल्या इतर ९ नातेवाईक व इतर १९ असे २८ जणांचे देखील स्वॅब घेण्यात आले होते. मात्र ते दुसऱ्यांदाही निगेटीव्ह निघाले आहेत. शनविारी (ता.२५) या रुग्णांचा दुसरा स्वॅब अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यात तो निगेटीव्ह आढळून आला आहे. आता २४ तासानंतर म्हणजे रविवारी तिसरा स्वॅब नमुना घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
अशी आहे जिल्ह्याची स्थिती
एकूण नव्याने दाखल झालेले संशयीत - २१
एकूण नोंद झालेले - ६४५
घरी विलगिकरण केलेले - २९८
संसर्गजन्य कक्षातील - ३५
विलगिकरणाचा कालावधी पूर्ण झालेले -३१२
परदेशातून आलेले -६२
परदेशातून आलेल्यांच्या संपर्कातील - ०६
हेही वाचा ...
हेही वाचा - संचारबंदी शिथील होताच उसळली गर्दी; वाचा कुठे?
पोलिसासोबत हुज्जत; भाजीविक्रेत्यांवर गुन्हा
परभणी : रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसण्यास विरोध करणाऱ्या नवामोंढा पोलिस ठाण्याच्या निरिक्षकास भाजीविक्रेत्यांकडून हुज्जत घालत त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार शनिवारी (ता.२५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास देशमुख हॉटेल परिसरात घडला.
शहरातील देशमुख हॉटेल परिसरात शनिवारी (ता.२५) सकाळी साडेसात वाजता काही भाजी विक्रेते एका ठिकाणी जमून भाजी विक्री करत होते. त्यावेळी नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले. त्यांनी सदर भाजीविक्रेत्यांना एका ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसू नका अशी विनंती केली. परंतू या भाजी विक्रेत्यांनी त्यास विरोध करून भाजीविक्री सुरुच ठेवली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना तेथून उठण्यास सांगितले. परंतू जागेवरून न उठता उलट पोलिसांची हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यामुळे पोलिस व भाजीविक्रेत्यामध्ये वाद निर्माण झाला. यातून भाजी विक्रेत्यांनी पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या अंगावर भाजीविक्रेते धावून गेले. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम लोकरे, छाया ज्ञानेश्वर लोकरे, नामदेव तुकाराम लोकरे, जनाबाई सुदाम घोगरे (सर्व रा. साईबाबा नगर, परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.