मराठवाडा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद

नवनाथ येवले

नांदेड : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकित मानधनासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी (ता.१३) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या जिल्हाध्यक्षा शततारका काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलामंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे मोर्चा दुपारी जिल्हा परिषदेवर धडकला. आंदोलनकर्त्या महिलांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडून घोषणाबाजी, थाळीनाद करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यातील थकित मानधनासह जिल्हा व राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता.१३) राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने संघटनेचे सरचिटणीस बृजपालसिंह, जिल्हाध्यक्षा शततारका काटकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी महिला कलामंदिर येथे दुपारी एकत्र आल्या. प्रलंबित मागण्यांची घोषणाबजी करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे मोर्चा जिल्हा पिरषदेवर धडकला. जिल्हा परिषद प्रांगणात दाखल होताच मार्चेकरी महिलांनी थाळीनाद, घोषणाबाजीने प्रशासनाचे लक्ष वेधले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रश्नांची दखल घेण्याची मागणी करत महिलांनी प्रांगणात ठिय्या मांडला. मोर्चेकरी महिला कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांना मागण्यांचे निवदेन दिले. 


अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनाच्या तुलनेत ५० टक्के रक्कम पेन्शन स्वरुपात देण्यात यावी, मानधनवाढीच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, पोषण आहार महिना साजरा करण्यासाठी खर्चीत रक्कम देण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागितलेली किरकोळ रजा देताना तीन दिवसांची लावण्यात आलेली बेकायदेशीर अट शिथील करण्यात यावी, मोबाईल अपडेट करण्यासाठी अंगणवाडी केंद्रात व्यवस्था करण्यात यावी, मोबाईल रिपेअरिंगसाठी कर्मचाऱ्यांना प्रवसासह भत्ता देण्यात यावा, ज्या मदतनिसकडून अंगणवाडीचे काम मोबाईलवर सक्तीने करुन घेतले जाते अशा मदतनिसांना सेविका पदाचे मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रकल्पात दिलेल्या पत्राची पोच देण्यात यावी, एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त, मृत्यू, राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ देण्यात यावा, आयसीटी- आरटीएम अंतर्गत सॉप्टवेअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एप्रिल २०१९ पासून पाचशे रुपये भत्ता देण्यात यावा, रिक्त जागेवर नियुक्ती करण्यात यावी, सेवासलगता देण्यात यावी, मिनी अंगणवडी सेविकांना नियमित अंगणवाडी सेविकांचा दर्जा देण्यात यावा आदी २३ मगाण्यांचा यामध्ये समावेश आहे. 

शिष्ठमंडळाचे निवेदन
मोर्चेकरी महिला कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांना मागण्यांचे निवदेन दिले. 
या वेळी राजेशसिंह, नंदकिशोर देशमुख, मुकुंद कदम, अश्विनी महाले, सुरेखा सावंत, कुशवर्ता पांचाळ, महानंदा पांचारा, निर्मला दापकेकर, रोहिनी टेंभुर्णीकर, अनुसया नवसागरे, कमल भगत, सत्यशिला पंडित आदींची उपस्थिती होती. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT