Anganwadi Worker sakal
मराठवाडा

Anganwadi Recruitment 2024 : आष्टी तालुक्यात अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सुरू; असा करा अर्ज

Anganwadi Recruitment latest news in marathi | आष्टी तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत हद्दीतील ७९ महसुली गावांत १२७ अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी - शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशानंतर आष्टी तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेचा मार्ग प्रशस्त झाला. तालुक्यातील १२७ ठिकाणी रिक्त असलेली मदतनीसांची पदे भरण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली असल्याची माहिती, बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली वाघमारे यांनी दिली.

आष्टी तालुक्यातील ७४ ग्रामपंचायत हद्दीतील ७९ महसुली गावांत १२७ अंगणवाड्यांमध्ये रिक्त असलेल्या मदतनीसांच्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाने शुक्रवारी (ता. २६) प्रसिद्ध केले आहे. सोमवारी (ता. २९) पासून अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार असून अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार (ता. ७ आॅगस्ट) हा आहे, असेही श्रीमती वाघमारे यांनी सांगितले.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा,पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर,B.Ed,D.Ed आणि सोबत MS-CIT केलेले उमेदवार देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. १८ ते ३५ वयोगटातील महिला उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत. उमेदवारांनी आपला अर्ज व अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ता. सात आॅगस्टच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, आष्टी येथे द्यावयाचे आहेत.

आवश्यक असलेली कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो

  • आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

  • रहिवासी दाखला

  • उमेदवाराची स्वाक्षरी

  • शाळा सोडल्याचा दाखला

  • शैक्षणिक कागदपत्रे

  • उमेदवाराची स्वाक्षरी

  • जातीचा दाखला

  • नॉन क्रिमीलेअर

  • डोमासाईल प्रमाणपत्र

  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Relations : तब्बल ३ वर्षांनी पाकिस्तानी मंत्री भारतात येणार! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच मोठी घडामोड; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

व्होट चोर, गद्दी छोड! काँग्रेसच्या भारत समिटमध्ये इटलीच्या नेत्यानं दिली घोषणा, नेमकं काय घडलं?

Stray Dog Bite : मंगळवेढा शहरात भटक्या कुत्राचा 12 नागरिकांना चावा

EV Bus Scooty Accident : इलेक्ट्रिक बस-स्कुटीची भीषण धडक! पैठण महामार्गावर महिलेचा बळी; दोघे गंभीर जखमी

Zapatlela Untold Story : 'तात्या विंचू' लंडनला कसा पोहोचला? सुपरहिट मराठी सिनेमाचं आणि शरद पवारांचं 'ते' खास कनेक्शन आलं समोर!

SCROLL FOR NEXT