file photo 
मराठवाडा

अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत ! 

कैलास चव्हाण

परभणी : जिल्ह्यातील इमारत नसलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. सध्या ४४ केंद्रांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एक हजार ७१७ अंगणवाडी केंद्रांची संख्या आहे. त्यातील एक हजार २४१ केंद्रांना स्वत:च्या हक्काच्या इमारती आहेत, तर किरायाच्या इमारतींमध्ये ४७६ केंद्र भरविले जातात. ज्या केंद्रांना स्वत:ची इमारत नाही, अशा केंद्रांना नवीन इमारत बांधून देणे आणि जुन्या इमारतींची अवश्यकतेनुसार दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
नोव्हेंबर महिन्यात जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यातून अंगणवाडी केंद्राची बांधकामे सुरू करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन केंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.


प्रतिकेंद्रासाठी साडेआठ लाख
ज्या गावात अंगणवाडी केंद्रासाठी नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी आठ लाख ५० हजार रुपये खर्च होणार आहेत. शासकीय जागेवर, अर्थात ग्रामपंचायतीने निर्धारित केलेल्या जागेवर इमारत बांधकाम होणार आहे.

नरेगांतर्गत २० केंद्र मंजूर
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून २० अंगणवाडी केंद्रांची बांधकामे होणार आहेत. गंगाखेड दोन, पाथरी एक, परभणी पाच, जिंतूर तीन, पालम दोन, सेलू दोन, मानवत एक, सोनपेठला दोन केंद्र मंजूर झाले आहेत.


तालुका     अंगणवाडी केंद्र        इमारत नसलेली केंद्र
गंगाखेड............ २२१.................   ८९
पाथरी...............१४४..................   ३२
परभणी.............. २४८...............     ७४
जिंतूर...............   ३१७................... ७७
पालम................ १७४..................... ६०
पूर्णा ....................१९५.................. ४१
सेलू .....................१५५.................. ४६
मानवत.................. १०४.................    १८
सोनपेठ ....................११३..................     ३९
एकूण .....................१७१७.............      ४७६


बांधकाम दर्जेदार होण्यासाठी लक्ष
जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येत आहे. बांधकाम दर्जेदार होण्यासाठी लक्ष दिले जात आहे.
- डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT