file photo 
मराठवाडा

प्राणी मोजता येतात, ओबीसींची जनगणना का नाही; खासदार राजीव सातव यांचा सवाल, राज्यसभेत मांडला मुद्दा

राजेश दारव्हेकर

हिंगोली : मागील अनेक वर्षांपासून ओबीसींच्या जनगणनेची मागणी होत आहे. ओबीसीच्या जनगणनेअभावी विविध योजनांच किती लाभ मिळतो आणि किती मिळायला पाहिजे, हेच कळायला मार्ग नाही. प्राणी, वृक्षांची गणना होते. मग ओबीसींची का नाही असा सवाल खासदार राजीव सातव यांनी राज्यसभेत उपस्थित केला.

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी शुक्रवारी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ओबीसीच्या जनगणनेसाठी सरकारने २०१८ मध्ये आश्वासन दिले होते. ते २०१९ मध्येही झाले होते, परंतु आता हे माहित झाले आहे की, ओबीसी स्तंभ हटविला गेला आहे. आता ओबीसीला योग्य लाभ मिळतो की नाही, हे त्यांच्या गणनेशिवाय कळणार नाही.

स्व. गोपीनाथ मुंडे जेव्हा खासदार होते, तेव्हा त्यांनीही ही मागणी ताकदीने लावून धरली होती. वर्षानुवर्षे ही मागणी केली जात आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ओबीसीच्या जनगणनेसाठी सरकारने योग्य पावले उचलायला हवीत, अशी मागणीही त्यांनी राज्यसभेत केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST चा मोठा निर्णय! बसचालकांवर आता साध्या वेशातील अधिकाऱ्यांची नजर राहणार, कारण काय?

Melatonin: शांत झोपेचे रहस्य! शरीरातील मेलाटोनिन हार्मोन नक्की काय काम करते ?

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये पुन्हा आंदोलन, आदित्य-अमित ठाकरे उपस्थित

Chas Dam Flood Release: चास कमान धरणातून २९,७९३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; ९९ टक्के भरलेले धरण, भिमा नदीला पूरस्थिती

Panvel News: एमएमआरडीएला मोठा झटका! पालिकेने १,२६० कोटींच्या निधीचा प्रस्ताव फेटाळला

SCROLL FOR NEXT