Raj Thackeray sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या जिवावर सत्ताधारी मते घेतात - राज ठाकरे

ज्या ज्या वेळेस मी मराठा आरक्षणाच्या बद्दल बोललो, त्या त्या वेळेस सांगितले की आरक्षण मिळणे कठीण आहे. कारण हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे.

सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर - ज्या ज्या वेळेस मी मराठा आरक्षणाच्या बद्दल बोललो, त्या त्या वेळेस सांगितले की आरक्षण मिळणे कठीण आहे. कारण हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. मात्र, ही सत्ताधारी मंडळी मराठा आरक्षणाच्या जिवावर मते घेतात, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे.

अंतरवाली सरटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलने सुरू आहे. सोमवारी (ता. चार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणकर्ते श्री. जरांगे यांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, की सत्ताधारी हे मराठा आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पुरुषांचे पुतळे यांच्या जीवावर राजकारण करून मते मागतात. त्यामुळे जेव्हा निवडणुक येईन, तेव्हा काठीचे बळ लक्षात ठेवा. जो लाठीमार करण्यात आला, यात पोलिसांचा काहीही दोष नसून ज्यांनी आदेश दिले, ते दोशी आहेत.

निवडणुका लागल्यानंतर या आरक्षणासाठी लाठीहल्ला व गोळीबार झाला हे लक्षात ठेवून सरकारला जागा दाखवा. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात मराठा आरक्षणामध्ये राजकारण करु नका. मी राजकारण करायला आलो नाही.

ज्यांनी ही घटना घडवली त्यांनी मराठा समाजाची माफी मागवी. आरक्षण व पुतळ्याच्या राजकारणवर सत्ता मिळवतात. मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊ. मी आपला प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेल, असे ही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

राज ठाकरे यांच्यासोबत मराठवाड्यातील अनेक मनसेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलक श्री. जरांगे यांच्या सोबत श्री. ठाकर यांनी मराठा आरक्षणाबद्दल वीस मिनिटे चर्चा केली. राज ठाकरे हे व्यासपीठवर न जाता खाली उभे राहून भाषण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलचं T20 World Cup साठी भारतीय संघात स्थान न मिळण्यावर मोठं विधान; म्हणाला, निवड समितीने...

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण; छाननी समिती कशासाठी?

Nashik News : तुमच्या खिशातील चिल्लर तुम्हाला बनवू शकते लखपती? नाशिकमध्ये नाणी-नोटांच्या खरेदी-विक्रीची धूम

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' समारंभाचे उद्घाटन

Navi Mumbai: उमेदवार बदलल्यामुळे प्रचारात भाजपचा गोंधळ, बाद झालेल्या उमेदवाराला कोर्टाने दिली परवानगी

SCROLL FOR NEXT