bank employ protest  
मराठवाडा

Video : बँक कर्मचाऱ्यांच्या घोषणाबाजीने नांदेड दणाणले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शासनाच्या वेळकाढू आणि मनमानी धोरणाविरोधात युनायटेड फोरम आॅफ बॅंक युनियनतर्फे दोन दिवसाचा संप पुकारण्यात आला आहे. त्याला नांदेडमध्येही पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.३१ जानेवारी २०२०) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेली बँक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, वाटाघाटी दरम्यान होत असलेला सरकारचा वेळकाढुपणा व केंद्र शासनाच्या मनमानी आर्थिक धोरणाविरोधात गा संप पुकारण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी नांदेड जिल्हा बँकर्स कमेटी संघटनेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजीनगर येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर व नंतर कलामंदिर भागातील मुख्य शाखेसमोर शहर व जिल्ह्यातील विविध भागातुन आलेल्या बँक कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

३१ जानेवारी ते एक फेब्रुवारी २०२० असे दोन्ही दिवस बँक कर्मचारी संपावर आहेत. संपाच्या निमित्ताने बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटना व एआयबीईएच्या वतीने आॅल इंडिया बँक आॅफ महाराष्ट्र कर्मचारी फेडरेशनचे महिला संयोजक अपर्णा मुखेडकर, राजु दुलेवाड, सागर दिक्षित, वैभव थोरकर, मंगेश हंबर्डे व एसबीआय एन.सी.बी. संघटनेच्या विजयलक्ष्मी अय्यर व इतर कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशीचा संप यशस्वी केला. सदरील धरणे-निर्देशनात नांदेड शहर व जिल्ह्यातील विविध बँकांतील कर्मचारी अधिकारी व उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT