लातूर : गणेशोत्सवादरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी निर्माल्य ग्रुप पुढे आले. या ग्रुपमधील स्वयंसेवकांच्या मदतीने शहरातील निर्माल्य जमा करण्यात आले.  
मराठवाडा

#MondayMotivation लातूरकर फुलवणार निर्माल्यापासून झाडे!

सुशांत सांगवे

लातूर : वाढत्या दुष्काळामुळे गणेशमूर्ती दान करण्याला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद निर्माल्य दान या उपक्रमालाही मिळाला. त्यामुळे लातुरात तब्बल 15 टन निर्माल्य जमा झाले. यातून लातूरकरांनी आणखी एक नवा आदर्श घालून दिला आहे. जमा झालेल्या निर्माल्यापासून खत तयार करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या खतापासून शहरात नव्याने लावण्यात आलेली झाडे फुलविण्यात येणार आहेत. 

लातूरात गेल्या आठ-दहा महिन्यांपासून दुष्काळाची स्थिती आहे. त्यात यंदाच्या पावसाळ्यात लातुरात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतांश विहिरी, धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका यांनी गणेश मंडळांसोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत गणेशमूर्ती दानाचा आणि निर्माल्य दानाचा निर्णय एकत्रितपणे घेण्यात आला. ज्या जलसाठ्यात पाणी शिल्लक आहे, ते प्रदूषित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लातुरात 28 हजार 775 गणेशमूर्ती दान म्हणून जमा झाल्या. तर घराघरांतील आणि गणेश मंडळांकडील निर्माल्य 15 टनांहून अधिक जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. 

निर्माल्य जमा करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरत होते. गणेशोत्सवाचे अकरा दिवस हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य ग्रुपने महापालिकेला मदतीचा हात देत 120 स्वयंसेवक निर्माल्य जमा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी नेमले. याबाबत निर्माल्य ग्रुपच्या मोनिका राठी म्हणाल्या, की आमच्या संघटनेचे दहा सदस्य आणि विविध महाविद्यालयांतील 110 विद्यार्थी असे आम्ही 120 जण निर्माल्य जमा करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत थांबलो होतो. यातील निम्मे स्वयंसेवक सकाळी अकरा ते सायंकाळी पाच, तर उर्वरित स्वयंसेवक सायंकाळी सहापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत रस्त्यावर होते. गणेशभक्तांकडून निर्माल्य घेऊन आम्ही पालिकेच्या वाहनात जमा करीत होतो. यंदा दुष्काळ असल्यामुळे निर्माल्य दान उपक्रमाला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे जलप्रदूषण टाळता आले, ही बाब आजच्या स्थितीत सर्वांत महत्त्वाची आहे. 


मूर्ती दान या उपक्रमाप्रमाणेच निर्माल्य दान या उपक्रमालाही लातूरकरांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवात जमा केलेल्या या निर्माल्याचे वर्गीकरण करून त्यापासून खत तयार करण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. हे खत शहरातील झाडांना टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- वसुधा फड, सहायक आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT