stop.jpg 
मराठवाडा

‘या’ विद्यापीठात ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ कागदोपत्रीच ?

श्याम जाधव


नवीन नांदेड ः सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशनुसार प्रत्येक विद्यापीठात ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानेही (ता. दहा) जून २०१९ रोजी ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ची समिती स्थापन केली. दरम्यान, सात महिन्यांचा कालावधी गेला, अजूनही या समितीची एकही बैठक झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
विद्यापीठांमधील व त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी रॅगिंगचा बळी ठरू नयेत, या हेतूने प्रत्येक विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये रॅगिंगविरोधी समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला दिले आहेत. समितीची बैठक घ्यावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले असतानाही ‘स्वारातीम’ विद्यापीठातील समितीने सात महिन्यांपासून एकही बैठक घेतली नाही. या बाबत विद्यापीठ प्रशासन किती उदासीन आहे या निमित्ताने समोर येत आहे.

विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास
महाविद्यालयात अथवा विद्यापीठात शिक्षण घेताना, वसतिगृहात राहायला असलेल्या विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास होणार नाही, याची दक्षता रॅगिंग विरोधी समितीच्या माध्यमातून घेतली जाते. विद्यार्थ्यांना थेट तक्रार करता यावी, यासाठी ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ समितीच्या सदस्यांचे मोबाईल क्रमांक, त्यांची नावे विद्यापीठाच्या प्रत्येक विद्याशाखेच्या इमारतीत, संकुलात लावणे आवश्‍यक आहे. मात्र, विद्यापीठात असे चित्र कुठेही दर्शनी भागात दिसणार नाही. दिसले तर अपवादच म्हणावे लागेल. दरम्यान, रॅगिंग विरोधी समिती आहे की नाही, त्यामध्ये कोण आहे, रॅगिंग विरोधी समितीतील सदस्यांना संपर्क कसा करायचा, असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांना पडले आहेत.

हेही वाचा -  दलित वस्ती विकास निधीचे फेरनियोजन अटळ !
मागील काही महिन्यांपासून त्याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही वा या बाबत विद्यापीठ प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही, असे दिसून येत आहे. सुदैवाने मेट्रो शहराच्या तुलनेत स्वारातीम विद्यापीठ परिसरात रॅगिंग होत असल्याच्या घटना समोर आल्या नसल्या तरी रॅगिंगविरोधी कायद्यांतर्गत कोणत्याही विद्यार्थ्याला रॅगिंगचा त्रास होऊ नये व रॅगिंग करणाऱ्यावर वचक बसावा, या उद्देशाने विद्यापीठ, प्रत्येक महाविद्यालयामध्ये स्वतंत्र समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठातील स्थापन केलेल्या समितीचा रुबाब गेली काही महिने कागदावरच पाहावयास मिळत आहे. रॅगिंग हा प्रकार घडत नसला तरी रॅगिंगचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रत्येक उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते.

वेगळे सांगायला नको

‘स्वारातीम’ विद्यापीठाने शैक्षणिक वर्षाच्या आरंभी रॅगिंगविरोधी समित्यांची स्थापना केली. परंतु, या समित्यांच्या बैठका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रॅगिंगप्रतिबंधक ‘ऍन्टी रॅगिंग सेल’ समित्यांचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच राहिले आहे, असे दिसून येत आहे. विद्यापीठात ही परिस्थिती असेल तर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची काय परिस्थिती असेल हे वेगळे सांगायला नको. दरम्यान, या बाबत एका विद्यापीठातील एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या बैठकीबाबत प्रशासनाशी बोलून दोन आठवड्यांत बैठक घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT