file photo 
मराठवाडा

तब्बल ३८ कोटींच्या आराखड्यास मंजुरी !

कैलास चव्हाण

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा २०२०-२१ वार्षिक कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. तब्बल ३८ कोटी १२ लाख रुपयांच्या आराखड्यात एक लाख ९९ हजार २७१ कामांचा समावेश करण्यात आला आहे.
रोजगार हमी योजना व राज्य अभिसरण अंतर्गत वार्षिक कृती आराखडा २०२०-२१ तयार करण्यात आला आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता. ३१) जिल्हा परिषदेत झालेल्या विशेष सभेत हा आराखडा सादर करण्यातत आला आहे. रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी हा आराखडा सादर केला आहे. त्यास सभागृहाने मंजुरी दिली आहे. या आराखड्यात अपू्र्ण कामे आठ हजार ५९३ असून ११ कोटी १७ लाख ३९९ रुपये किंमत असून ९७.३४ मनुष्य दिवस आहेत. तर सेल्फवरील कामांची संख्या १२ हजार १०१ एवढी असून दहा कोटी दोन लाख २७ हजार १६ रुपये किंमत आहे. नवीन प्रस्तावित कामे एक लाख ७८ हजार ५७७ एवढी आहेत. त्यासाठी ३५ कोटी नऊ लाख ८८ हजार ७०४ रुपये असे एकूण एक लाख ९९ हजार २७१ कामे आणि ३८ कोटी १२ लाख ८८ हजार १९ रुपयांचा आराखडा आहे.

सार्वजनिक कामेदेखील
यामध्ये अभिसरणांतर्गत जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंध, सिंचन, पारंपरिक पाणीपुरवठा, पूर संरक्षण, रस्ता कामे अशा कामांचा समावेश आहे. त्यासोबतच ११ कलमी कार्यक्रमांत मागेल त्याला शेततळे, कंपोस्ट, फळबाग लागवड, शोष खड्डे, गाव तलाव, पारंपरिक साठ्यांचे नुतनीकरण व गाळ काढणे, जलसंचारर, वृक्षलागवड, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरण, ग्रामपंचायत भवन, गावातील रस्ते, घरकुले, गुरांचा गोठा, कुकुटपालन, शेळीपालन शेड, तुती लागवड या कामांचा समावेश आहे. तसेच नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्याची सार्वजनिक कामेदेखील आहेत.

एक लाख २० कुटुंबांनी केली मागणी
जिल्ह्यात दोन लाख ३४ हजार ५९२ कुटुंबे नोंदणीकृत आहेत. त्यातील मजूर संख्या ही पाच लाख सहा हजार १४२ एवढी आहे. तर कामाची मागणी करणाऱ्या कुटुंबांची संख्या एक लाख २० हजार ३७६ एवढी आहे.


विषय समित्यांचे खातेवाटप जाहीर
 जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे खातेवाटप शुक्रवारी (ता. ३१) करण्यात आले. शिक्षण खाते अंजली आनेराव, तर कृषी खाते मीरा टेंगसे यांना देण्यात आले. सत्तेत कुठेच वाटा न मिळाल्याने स्पर्धेतील सदस्यांची नाराजी या वेळी पाहायला मिळाली.
जिल्हा परिषदेच्या कै. बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात शुक्रवारी दुपारी एक वाजता विशेष सभा पार पडली. 
या वेळी अध्यक्षा निर्मला विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., रोहयो उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांच्यासह निवडलेले सभापती, सदस्य उपस्थित होते. शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून शिवसेनेच्या अंजली आनेराव, कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा टेंगसे यांची निवड झाली. उर्वरित बांधकाम आणि अर्थ हे विषय उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्याकडे देण्यात आले.

इच्छुक सदस्यांना पद मिळाले नसल्याने नाराजी
यापूर्वी महिला व बालकल्याण सभापतिपदी शोभाताई घाटगे यांची, तर समज कल्याण सभापती म्हणून रामराव उबाळे यांची निवड झालेली आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेनेसह राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. अनेक इच्छुक सदस्यांना पद मिळाले नसल्याने त्यांची नाराजी दिसून आली. तर पद मिळाले परंतु, मनासारखे खाते मिळाले नसल्याने असेही काही पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती. अनेक नाराज सदस्यांनी सभेला येण्याची औपचारिकता पूर्ण करत स्वाक्षरी होताच सभा सोडून जाणे पसंत केले. पाथरी, मानवत, गंगाखेड तालुक्यातील शिवसेनेसह राष्ट्रवादीचा मोठा गट नाराज असल्याने आगामी काळात धुसफूस सुरू होणार, हे निश्चित आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT