arjun shiv chhatrapati award by sports minister bansode latur sakal
मराठवाडा

Latur News : अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा गौरव

राज्यस्तरीय युवा महोत्सव : क्रीडामंत्री बनसोडे यांच्या हस्ते सत्कार

युवराज धोतरे

उदगीर, (जि.लातुर) : क्रीडा व युवक संचालनाच्या वतीने येथील क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यातील अर्जुन पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा सन्मान झाल्याची भावना खेळाडूमध्ये निर्माण झाली आहे. येथील तालुका क्रीडा संकुलावर शनिवारी (ता.३०) आयोजित युवा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात या मान्यवर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, गोविंद केंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त अदीती स्वामी, सारिका काळे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी विधी पळसामुरे, हितेंद्र सोमाणी, माधव बागवे, डॉ मनिष गवई शिवछत्रपती पुरस्कारार्थी पद्माकर फड,

ऋषीकेश अनारकल्ले, रविंद्र पेठे, सुजित शेंडगे, विश्वतेज मोहीते यांचा क्रीडामंत्री बनसोडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतीचिन्हन देऊन क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.

महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडूंना पायाभूत सुविधा पुरवुन दर्जेदार खेळाडू निर्माण करण्याचा मानस व्यक्त करुन जागतिक पातळीवर नाव कमावलेल्या खेळाडूंचे आदर्श उमद्या खेळाडूंनी घ्यावे असे आवाहन यावेळी क्रीडा मंत्री बनसोडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT