Arrest accused in Purana riots Parbhani
Arrest accused in Purana riots Parbhani 
मराठवाडा

पुर्णा दंगली तील आरोपीस परभणीत अटक

सकाळवृत्तसेवा

परभणी : पूर्णा शहरात 2017 मध्ये झालेल्या दंगलीतील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. 22) गंगाखेड नाका परिसरातून अटक केली.

पूर्णा शहरात 2017 मध्ये सार्वजनिक मिरवणुकीतील दंगल व नुकतीच ता.25 ऑगस्ट 2018 रोजी शहरात दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या वादाने दंगल उसळली होती. या दंगलीत मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. या व इतर दंगलीत सक्रीय सहभाग नोंदवून टोळीचे नेतृत्व करणारा रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ नरहरी सोलव (वय 24, रा. बरबडी ता. पूर्णा) हा शनिवारी परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाली होती. श्री मोरे यांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत सापळा रचून सोमनाथ नरहरी सोलव यास ताब्यात घेतले. शासकीय नोकरावर हल्ले करणे, दंगा करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या कारवाईत पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, लक्ष्मीकांत धुतराज, भगवान भुसारे, हरी खुपसे, दिलावर पठाण, जमीरोद्दीन फारुखी, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, परमेश्वर शिंदे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT