Viral Letter esakal
मराठवाडा

Viral Letter: मम्मी-पप्पाला अटक करा अन्...; तिसरीतील साईरामचे पोलिस काकांना पत्र

Viral Letter: लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पालकांनी मताचा हक्क बजावावा, यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळ घातली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: ‘पोलिस काका, माझे मम्मी-पप्पा मतदानाच्या दिवशी बाहेर गावी जाणार आहेत. त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करून मतदानाला न्या. पण, पुन्हा सोडून द्या’, अशी विनंती करणारे पत्र ताकतोडा (ता. सेनगाव) येथील चिमुकला साईराम कैलास सावके याने गोरेगाव पोलिसांना शनिवारी (ता. ३०) दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पालकांनी मताचा हक्क बजावावा, यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळ घातली जात आहे.

त्यातूनच जिल्हा परिषद शाळा ताकतोडा येथील इयत्ता तिसरीतील साईराम याने घरी आई, वडिलांमध्ये होणारा संवाद पोलिसांना लिहिलेल्या पत्राद्वारे मांडला. मतदानाच्या दिवशी आई-वडिलांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले. त्यांना अटक करून त्यांच्याकडून सक्तीने मतदान करून घेण्याची विनंती साईरामने पत्रातून केली आहे. शिवाय त्यांनी मत दिल्यानंतर त्यांना सोडून द्यावे, असेही त्याने पत्रात नमूद केले आहे.

काय आहे पत्रात?

‘चांगल्या माणसांना मतदान केले तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील व चांगली कामे करतील. आमचे शिक्षक म्हणतात, आपल्याकडे १०० टक्के मतदान झाले पाहिजे. मात्र, माझे मम्मी-पप्पा बाहेरगावी जाणार असल्याने त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी. मतदानानंतर त्यांना सोडून द्यावे’, असा मायना असलेले पत्र साईरामने पोलिसांनी दिले. गोरेगाव पोलिसांनी त्याचे कौतुक करून या पत्राची पोलिस दप्तरी नोंद करून घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bonus Rule: Bonus Rule: कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 20 टक्यांपर्यंत बोनस मिळणार; कुणाला होणार फायदा?

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

इन्स्टावर ओळख, लग्नाच्या आमिषाने ठेवले संबंध; १७ वर्षीय मुलीनं बाळाला जन्म देताच २० वर्षीय आरोपी फरार, नवी मुंबईतील घटना

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT