file photo 
मराठवाडा

प्रेमी युगलांना मारहाण करणाऱ्यांना अटक

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरापासून जवळच असलेल्या हस्सापूर शिवारात एका प्रेमी युगलाना तलावारीने मारहाण करून जबरीने लुट करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पाठलाग करून अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता. चार) पहाटे दोनच्या सुमारास विष्णूपुरी परिसरात केली. यावेळी पथकावर या चोरट्यांनी प्राणघातक हल्ला चढविला होता. यात एक पोलिस जखमी झाला आहे. 

हडको येथे आपल्या एका मैत्रीणीसोबत शहरातून जाणाऱ्या प्रेमी युगलांना रस्त्यात अडवून तलवारीने व दगडाने मारून जखमी केले. यानंतर अनोळखी चोरट्यांनी ४० हजाराची सहा ग्राम वजनाची सोन्याची पोत व अंगठी जबरीने चोरुन नेली. ही घटना हस्सापूर ते मामा चौक दरम्यान शनिवारी (ता. एक) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. हा प्रकार गंभीर असल्याने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी लक्ष घातले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  द्वारकादास चिखलीकर यांना तशा सुचना दिल्या. 

एपीआय रमाकांत पांचाळ यांची कामगिरी

यावरून त्यांनी आपले अधिकारी रमाकांत पांचाळ यांच्या पथकाला कार्यरत केले. या पथकाने गुप्त माहिती काढून रात्रभर या तिन्ही चोरट्यांच्या मागावर विष्णुपूरी परिसरात सापळा लावला. अत्यंत चलाखीने या तिघांना पकडण्यासाठी पोलिस पुढे सरकताच या चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यात पोलिस मोतीराम पवार हे जखमी झाले. एवढेच नाही तर विकास हटकर हा नग्न अवस्थेत कॅनालमध्ये उतरून पळत होता. मात्र रमाकांत पांचाळ यांच्या सहकऱ्यांनी या तिघांच्याही मुसक्या आवळल्या. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अशी घडली होती घटना

हडको एन. डी. ३१ मध्ये राहणारा विनोद कल्याणकर होळकर (वय ३१) हा नांदेडहून शनिवारी (ता. एक) रात्री नऊच्या सुमारास आपल्या दुचाकीवर मैत्रीणीसोबत निघाला. तो हस्सापूर ते मामा चौक रस्त्याने जात असताना पुलाजवळ एका दुचाकीवर थांबलेल्या दोन युवकांनी त्याला अडविले. तलवारीने त्याला मारून जखमी केले. यानंतर त्याच्या मैत्रीणीलाही मारहाण केली. एवढेच नाही तर तिच्या गळ्यातील ४० हजार रुपये किंमतीची सहा ग्राम वजनाची सोन्याची पोत जबरीने तोडून घेतली. तसेच हातातील सहा ग्राम वजनाची सोन्याची अंगठीही काढून घेतली. तसेच पोलिसात तक्रार दिली तर ठार मारण्याची धमकी दिली होती. जखमी अवस्थेत विनोद होळकर हे नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे. रविवारी (ता. दोन) रात्री त्याच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोन चोरट्यांविरुद्ध जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र सांगळे करीत होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT