मराठवाडा

Hingoli Corona News : नुसता सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नव्हे! भीती नको, अशी घ्या खबरदारी

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण अनेक राज्यांत आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने नवीन नियमावली घोषित केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सर्दी, खोकला वा ताप आल्यास समोरच्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा किंवा त्याची लक्षणे आहेत, असा संशय बळावतो. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण अनेक राज्यांत आढळून येत असल्याने आरोग्य विभागाने नवीन नियमावली घोषित केली आहे. आजारी व्यक्ती, शस्त्रक्रिया झालेल्या किंवा ज्येष्ठांना खबरदारी म्हणून मास्क सक्ती केली आहे. तथापि, नव्या व्हेरियंटचा संसर्ग होण्याचा प्रभाव कमी आहे. सध्या सर्दी, खोकला वा ताप येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामागे ऋतू आणि हवामानातील बदल कारणीभूत आहेत. त्यामुळे आजारी पडलेल्या प्रत्येकाला कोरोनाच झाला आहे, या नजरेतून पाहणे योग्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.

भीती नको, खबरदारी घ्या

नव्या कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही. मात्र, खबरदारी अपेक्षित आहे. लहान मुलांसह आजारी रुग्ण, ज्येष्ठांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व आजारी असलेल्यांना तसेच शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना मास्क वापरणे आवश्‍यक आहे.

उगाच शंका नको

तीव्र सर्दी, खोकला, छाती भरून येणे, तीव्र ताप ही कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. प्रत्येक व्यक्तीला हंगामात सामान्यपणे किमान दोन वेळा सर्दी किंवा ताप येतो. या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. शंका वाटल्यास कोरोनाची चाचणी करायला हवी, मात्र या स्वरुपाच्या व्यक्ती समोर आढळून आल्यास त्यांना कोरोना झाल्याची शंका व्यक्त करणे योग्य नाही.

यातून अकारण भिती वाढून सामाजिक धोका निर्माण होऊ शकतो. सर्दी, ताप असलेल्या व्यक्ती घाबरून घरात बसतात. यामुळे त्यांच्या कामकाजावर परिणाम होतो. निदान करणे जरुरी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी सांगितले.

कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संसर्ग कमी आहे. मात्र, प्रत्येकाने काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा. साबणाने नेहमी स्वच्छ हात धुतले पाहिजे. कोणताही आजार अंगावर काढू नये, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, हिंगोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT