अशोक चव्हाण 
मराठवाडा

अशोक चव्हाण यांना मिळणार मंत्रीमंडळात स्थान

अभय कुळकजाईकर

नांदेड - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या संभाव्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असून त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना स्थान मिळणार का? याची चर्चा सुरु झाली आहे. सध्या अशोक चव्हाण यांच्यासह कॉँग्रेसचे दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार?, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षाने मिळून महाविकास आघाडी स्थापन करत ता. २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यांच्यासमवेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचा समावेश आहे. राज्यात कॉँग्रेसचे ४४ आमदार असून त्यात दोघांना मंत्रीपद मिळाले आहे. मराठवाड्यात सर्वाधिक चार जागा नांदेडमध्ये तर लातूर जिल्ह्यात दोन आणि परभणी जिल्ह्यात एक जागा कॉँग्रेसला मिळाली आहे. आणखी आठ मंत्रीपदे कॉँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. त्यापैकी आता कोणाला मंत्रीपदे मिळतात, याची उत्सुकता लागली आहे. 

नेतेमंडळी दिल्लीत दाखल
दरम्यान, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी दिल्लीत दाखल झाली आहेत. मंत्रीमंडळातील समावेशाबाबत नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान कॉँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली आहे. 

अशोक चव्हाणांचे मंत्रीपद निश्‍चित
आमदार, खासदार, महसूल, उद्योग, सांस्कृतिक, परिवहन अशा विविध महत्वाच्या खात्याचे मंत्री तसेच दोनदा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळलेल्या अशोक चव्हाण यांचे मंत्रीपद निच्शित असल्याचे मानले जात आहे. नागपूरहून हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. शनिवारी श्री. चव्हाण दिल्लीत पोहचले आहेत. मराठवाड्यातून श्री. चव्हाण यांचे मंत्रीमंडळात स्थान निच्शित असल्याची माहिती मिळाली आहे. श्री. चव्हाण यांच्या समर्थकांनीही देखील श्री. चव्हाण यांना मंत्रीमंडळात स्थान देण्याची मागणी केली आहे. 

लवकरच होणार विस्तार
मंत्रीमंडळाचा मंगळवारी (ता. २४) विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अजूनही शिवसेना, राष्‍ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या कोणाचा समावेश होणार, याची नावे ‘फायनल’ झाली नसल्याने मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रीपदासाठी सध्या जोरदार लॉबिंग सुरु असल्याची माहिती आहे. कॉँग्रेसकडून मंत्रीमंडळात कोणाचा समावेश करायचा, या संदर्भात एक दोन दिवसात कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नांदेडकर घटनांवर लक्ष ठेऊन
मागील वेळेस भाजप सेना युतीचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी २०१४ ते २०१९ या कालावधीत नांदेड जिल्ह्याला मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. आता २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्याला अशोक चव्हाण यांच्या रुपाने पुन्हा एकदा मंत्रीमंडळात स्थान निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचे वर्ष हे ज्येष्ठ नेते (कै) शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या वर्षातच त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता वाढल्याने कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नांदेडकरांमध्येही उत्साह आहे. त्यामुळे आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी नांदेडकरही वाट पाहत आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीजेचा लपंडाव, सोलापूर शहराला आता ४ दिवसाआड पाणी! औज बंधारा कोरडा, पाकणीचे जलशुद्धीकरण केंद्र बंद, सोरेगावचा पंप जळाला, वाचा...

Panchang 20 April 2026 : अक्षय्य तृतीया विशेष पंचांग! शुभ मुहूर्त, ग्रहयोग आणि आजचे महत्त्व जाणून घ्या

मोठी बातमी! खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती आता ऑनलाईन; अल्पसंख्यांक शाळांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र पोर्टल, संस्थापकांची थांबणार मनमानी

आजचे राशिभविष्य - २० एप्रिल २०२६

Latur Crime: चुलतीने केला सात वर्षाच्या बालकाचा खून; चाकूर तालुक्यातील थरारक घटना, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT