मराठवाडा

ATC Raid : मालेगावसह मराठवाड्यात एटीएस, एनआयएची पहाटे छापेमारी; अनेक तरुणांना उचललं

Malegaon maratahi News: पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

संतोष कानडे

NIA Raid: देशविघातक कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरुन एटीएस आणि एनआयएने शनिवारी पहाटे तीन ठिकाणी छापेमारी केली. देशात अनेक ठिकाणी रेड झालेल्या आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी नगर, जालना, मालेगाव येथील काही तरुणांना पहाटे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

शनिवारी पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केलेली होती.

पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.

देशविघातक काम करणाऱ्या आणि जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. नेमक्या कुठल्या लोकेशन्सवर छापेमारी झाली आणि किती तरुणांना ताब्यात घेतलं, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

एनआयएने महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत असं एकाच वेळी 22 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती आहे. दहशतवादी कट रचल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे. काही लोकांना NIA ने ताब्याही घेतलं आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा NIA ला संशय आहे. महाराष्ट्रातील मालेगाव, जालना आणि संभाजीनगर येथे NIA च्या छाप्यांमध्ये एटीएसचे पथकही सोबत होते. NIA ने मालेगाव येथील होमिओपथी क्लिनिकमधून ४ जणांना ताब्यात घेतलं आहे. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

ऑफिसच्या कामांची सुट्टी! OpenAI ने लॉन्च केले GPT-5.4, आता तुमचा लॅपटॉप-कॉम्प्युटर चालवणार स्वतः AI

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमान 39.8°; 40 अंश पार होण्याची शक्यता

UPSC Exam Result : यूपीएससीत राज्यातील ६० उमेदवार उत्तीर्ण

Iran War Statement : खैमेनींच्या माघारी इराणचे प्रमुख खतीबजादेह यांची जबाबदारी, शेवटची गोळीपर्यंत लढण्याचा केला निर्धार, युद्ध आणखी पेटणार

SCROLL FOR NEXT