Attempt to break the ATM in Vishnupuri area Nanded
Attempt to break the ATM in Vishnupuri area Nanded 
मराठवाडा

एटीएम फोडण्याचा प्रयत्न; विष्णुपूरी भागातील घटना 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : विष्णूपुरी भागात असलेल्या एसबीआय बँकेचे एक एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ही मशीन फुटली नसल्याने मशीनमधील दहा लाख रुपये वाचले. ही घटना मुख्य रस्त्यावर विद्यापिठाच्या जुन्या गेटसमोर शनिवारी (ता. 15) रात्री घडली. 

भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत असलेले दोन एटीएम मशीन फोडून सोळा लाखाचा एेवज लंपास केल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा विष्णुपूरी भागात मुख्य रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु रहदारीच्या रस्त्यावर वर्दळ असल्याने चोरट्यांचा हा प्रयोग फसला. मात्र त्यांनी एटीएम मशिनची तोडफोड करून मोठी नुकसान केली. सुदैवाने एटीएममधील दहा लाख रुपयाची रक्कम चोरट्यांना मिळाली नाही. ही बाब रविवारी (ता.16) सकाळी काही सुज्ञ नागरिकांनी नांदेड ग्रामिण पोलिसांना कळविले. यावेळी पोलिस फौजदार गजानन मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यासह घटनास्थळ गाठले. पंचनामा केला परंतु सुटीचा दिवस असल्याने सिसीटीव्ही फुटेज त्याना मिळाले नाही. तसेच तक्रार देण्यास बँक अधिकारी किंवा एटीएम चालविणारी एजन्सी पुढे येत नव्हती अखेर उशिरा या प्रकरणी गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे पुन्हा एटीएम मशिन फोडणारी टोळी सक्रीय झाली की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

'नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचा हद्दीत असलेल्या अनेक एटीएम मशिनला सुरक्षा रक्षक नाहीत. यामुळे चोरट्यांची हिंम्मत वाढत आहे. बऱ्याच मशिनमध्ये नादुरूस्त सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या एटीएमलासुध्दा सुरक्षा रक्षक नव्हता. बँकेने किंवा एटीएमची सेवा देणाऱ्या कंत्राटदारांने सुरक्षा रक्षक नेमल्यास अशा घटना घडणार नाहीत,' असे मत फौजदार गजानन मोरे यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT