Kej Crime News Sakal
मराठवाडा

Kej Crime News : घरावर पेट्रोल टाकून कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न; ढाकेफळ येथील मध्यरात्रीची घटना

कुटुंब झोपेत असताना घरावर पेट्रोल टाकून जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न

रामदास साबळे

केज : कुटुंब झोपेत असताना घरावर पेट्रोल टाकून जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवार (ता.०६) रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ढाकेफळ येथे घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील ढाकेफळ येथील गोविंद दिलीप थोरात हे आपल्या पत्नीसह व वैजेनाथ व्यंकटी थोरात हे पत्नी, दोन मुलासह सोमवारी रात्री जेवण उरकून घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या वेळी अज्ञाताने या कुटुंबाला जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या घरावर पेट्रोल टाकून आग लावली. क्षणार्धात पेट्रालमुळे आगीचा भडका उडाला नि झोपेत असलेल्या कुटुंबाला काय होतेय हे समजेनासे झाले.

या प्रकाराने जागे झालेल्या लहान मुलांनी टाहो फोडला तर घरातील महिला-पुरूषांनी वाचविण्यासाठी आरडा-ओरड केल्याने शेजारी झोपेतून जागे झाले. आगीचा लोट पाहून त्यांनी पेटलेल्या घराकडे धाव घेतली. यावेळी धनराज राजेंद्र थोरात यांनी घराचे पत्रे फाडून मुला-बाळासह सर्वांना बाहेर काढले. या आगीच्या घटनेत वैजेनाथ थोरात यांचा हात- पाय, व डोक्याचा बराचसा भाग भाजला आहे.

तसेच गोविंद थोरात व त्यांच्या पत्नीलाही थोड्याफार भाजून जखमा झाल्या आहेत. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याने या कुटुंबाला जीवे मारण्याच्या हेतू असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT