NND19A89237 
मराठवाडा

‘या’ कलेवरची रसिक श्रोत्यांची निष्ठा आजही कायम

सकाळ वृत्तसेवा

नांदेड ः श्री क्षेत्र माळेगावच्या खंडोबा यात्रेची सुरुवात होते ती भंडारा उधळुन, त्यानंतर सलग सहा दिवस चालणाऱ्या यात्रेत पशुप्रदर्शन, महिला बचतगटाचे प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल आणि त्यानंतर ठसकेबाज लावणी आणि सर्वात शेवटी सादर होते ती महाराष्ट्राची लोककला. या कलेवरची रसिक श्रोत्यांची निष्ठा आजही कायम असल्याची प्रचिती शनिवारी (ता.२८) पारंपरिक लोककला महोत्‍सवात रसिक श्रोत्यांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसादावरून आली.
जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने येथे शनिवारी लोककला प्रकाराचे सादरीकरण झाले. यात सुरुवातीस मंदाराणी सातारकर यांनी ‘आली ठुमकत नार लचकत...’ ही बहारदार लावणी सादर करून पहिल्याच लावणीवर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर रघुवीर खेडकर यांच्‍या मंडळाने एका पाठोपाठ एक अशी विविध लावण्‍यांसह पारंपरिक गिते सादर केली. तर भिमा भिका सांगवीकर नाट्य मंडळातील अर्चना सांगवीकर यांनी पोटासाठी नाचते मी... संध्‍या नेटके यांनी ‘आंबा तोता पूरी...’ ही लावणी सादर करुन रसिकांच्या टाळ्या अन् शिट्या मिळविल्या. 


यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर, आमदार श्‍यामसुंदर शिंदे, शिक्षण व आरोग्‍य सभापती माधवराव मिसाळे, सामाजिक कार्यकर्ते आशाताई शिंदे, पोलिस उप अधिक्षक दत्‍तराम राठोड, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी व्‍ही.आर.कोंडेकर, डि.यू.इंगोले, व्‍ही.आर.पाटील, गट विकास अधिकारी पी.पी.फांजेवाड, जिल्‍हा परिषद सदस्‍य चंद्रसेन पाटील, दशरथ लोहबंदे, रंगनाथ भुजबळ, श्रीनिवास मोरे, दत्‍ता वाली, लोहा पंचायत समितीचे सभापती सतिश पाटील उमरेकर, बालाजी कदम, बालाजी वैजाळे, बालाजी राठोड, माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच गोविंदराव राठोड, बालाजी राठोड, विस्‍तार अधिकारी शिवाजी ढवळे, डी.पी.धर्मेकर, राजीव भोसीकर, एस.टी.शेटवाड, ग्राम विकास अधिकारी बी.जी.बरुरे आदींची उपस्थिती होती.

माळेगावात सहा लोककला तमाशा मंडळ
महाराष्‍ट्राची लोकपरंपरा माळेगाव यात्रेत टिकून आहे. त्‍यामुळे माळेगाव यात्रेत मोठ्या प्रमाणात तमाशा मंडळ दाखल होतात. या वेळी सहा लोककला तमाशा मंडळ माळेगावात आले आहेत. रघुवीर खेडकर, कुंदा पाटील पुणेकर, आनंद लोकनाटय मंडळ, पांडूरंग मुळे नारेकर, भिका भिमा सांगवीकर आणि हरीभाऊ बडे नगरकर यांचे तमाशा मंडळ माळेगावात आहेत.

ग्रामीण भागातील कलाकारांचा सहभाग
याप्रसंगी दिक्षा सोनकांबळे, सौरभ जोंधळे, छबुलाखे कराडकर, स्‍वरांजली नायगावकर यांच्‍यासह ग्रामीण भागातील कलाकारांनी गितगायन, लावणी, बासरी वादन, जोक्‍स, मीमीक्री, गोंधळ, बतावणी, नाटीका, भरत नाटयम, विविध चित्रपट गितांवरील डान्‍स, वाघ्‍या मुरळी आदी कलाप्रकाराचे सादरीकरण झाले. माळेगाव येथे दाखल झालेले सर्व तमाशा मंडळांनी एकापेक्षा एक लावण्‍या सादर करुन रसिकांची दाद मिळविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT