aundha lake aundha lake
मराठवाडा

Hingoli Rain: औंढा तलाव ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकरी सुखावले

सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शहरातलगत असलेला औंढा तलाव शंभर टक्के भरला असून तो ओव्हरफ्लो झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

-दतात्रय शेगुकर

औंढा नागनाथ (हिंगोली): औंढा शहर व तालुक्यात सोमवारी दिवसभर व रात्री झालेल्या जोरदार पावसाने औंढा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावातील पाणी मंगळवारी ता.सात ओसंडून वाहत होते. याचा लाभ शहरातील पाणी पुरवठ्यासाठी होणार असल्याने नागरिक समाधानी झाले आहेत. औंढा शहर व परिसरात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी, नाले, ओढे,बंधारे तुडुंब भरले आहेत. सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शहरातलगत असलेला औंढा तलाव शंभर टक्के भरला असून तो ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातून पाणी ओसंडून वाहत आहे.

या तलावातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. आता हा तलाव शंभर टक्के भरला असल्याने औंढा शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. तसेच हा तलाव भरल्याने तलावाच्या परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल व शेततळ्याच्या पाणी पुरवठ्यासाठी देखील लाभ होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकासह शेतकरी देखील समाधानी झाले आहेत. या तलावाच्या परिसरात औंढा शहराचा काही भाग तसेच वगरवाडी, वगरवाडी तांडा या भागातील शेती देखील सिंचनाखाली येते. औंढा नागनाथ शहर व तालुक्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

दरम्यान मागच्या पंधरा दिवसांपूर्वी देखील झालेल्या पावसाने हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. या वर्षीच्या पावसाळ्यात दोन वेळा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याचा लाभ नागरिकांसह शेतकऱ्यांना होणार असल्याने ते समाधानी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांच्या लाईफलाईनमध्ये पुन्हा राडा! प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत...; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Railway Flyover Update : जळगावला आणखी दोन रेल्वे उड्डाणपुलांची चाहूल? 'या' प्रकल्प मार्गावर होऊ शकतो पूल; रेल्वे विभागाकडून महापालिकेत प्राथमिक चाचपणी

Latest Marathi News Live Update : दिल्ली दंगल UAPA प्रकरणातील शरजील इमामच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाने पोलिसांची भूमिका जाणून घेतली

बाबो! स्वप्नील जोशीने घेतली ६५ लाखांची टेस्ला; भावनिक पोस्टनं जिंकली चाहत्यांची मनं

Congress on Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; 'उपोषण मागे घेण्याच केलं आवाहन

SCROLL FOR NEXT